कोल्हापूर - कोल्हापुरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. तरीही दीपावलीच्या खरेदीसाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. ज्या दुकानांमध्ये नियमांचे पालन होताना दिसणार नाही. किंवा जास्त गर्दी दिसेल ती दुकाने 3 तास बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचे उप-आयुक्त निखिल मोरे यांनी याबाबत 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.
यंदा दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करा-
दिवाळी दरवर्षी येते त्यामुळे यंदा दिवाळी साध्या पद्धतीने साजरी केली तर काहीही फरक पडणार नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जर आणखी वाढला. तर पुढची दिवाळीसुद्धा अशीच जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करून साधेपणानेच दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
हेही वाचा- 'कोरोनाबाबत महाराष्ट्राच्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक.. दिवाळी, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क'
हेही वाचा- मुंबई कोरोना अपडेट : चोवीस तासांत 535 नवे बाधित... तर 22 रुग्णांचा मृत्यू