कोल्हापूर : महाराष्ट्रामध्ये युती सरकारने केलेला विकास, पुढे नेलेले प्रकल्प याला अजित पवार यांनी साथ दिली आणि आमच्यासोबत आले. त्यामुळे सरकार आणखी मजबूत झाले. महायुतीसोबत आता 200 पेक्षा जास्तीचा आमदारांचा संख्याबळ सरकारच्या पाठीशी आहे. त्यामुळे आणखी जोरामध्ये आणखी वेगामध्ये या राज्याचा विकास आम्ही करणार. काही गोष्टी होतात नवीन मित्र आल्यानंतर थोडी कुजबुज होते मात्र बाकी आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सगळ्यांना न्याय मिळेल आणि सगळ्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये विकासाला निधी कमी पडणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो मात्र आता मी मुख्यमंत्री आहे : शिंदे फडणवीस सरकारसोबत अजित दादा आल्याने राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे दरम्यान एक आठवडा झाला तरी खाते वाटप अद्याप झाले नसल्याने विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती तर अजित पवार यांना अर्थ खात देण्यास शिंदे गटाकडून देखील विरोध करण्यात येत होता मात्र आज खातेवाटप झाले आणि अजित पवार यांना अर्थ खात देण्यात आला महाविकास आघाडीच्या काळात देखील अजितदादा निधी देत नव्हते म्हणून शिंदेंनी शिवसेनेत बंद करून भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन केली मात्र आता देखील अर्थ खात हे अजित दादांकडे आल्याने याबाबत त्यांना विचारले असता यावेळी ते म्हणाले तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो मात्र आता मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे सगळ्या आमदारांना न्याय देण्याचं काम आम्ही करू कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही. देवेंद्र फडणवीस देखील उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेला आहे. त्यांना देखील दांडगा अनुभव आहे. तर अजितदादांना देखील प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री आहे आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल असे ही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
त्यांच्या काकी आजारी, त्यांची भेट घेण्यासाठी गेले : दरम्यान, खातेवाटपाचे कार्यक्रम होताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिल्वर ओकवर गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले. याबाबत देखील एकनाथ शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांच्या काकी आजारी आहेत आणि ते त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. यामध्ये मला काही बाकीचं वाटत नाही. असेही शिंदे म्हणाले असून उर्वरित मंत्रिमंडळ विस्तारही वेळेवर होईल. आम्ही हे जे काही निर्णय घेतला आहे विचार करून घेतला आहे. आमचे सर्व आमदार अतिशय मॅच्युअर आहेत. त्यामुळे योग्य वेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.