ETV Bharat / state

नागरिकांनो घाबरू नका, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांशी संवाद

author img

By

Published : Jul 30, 2021, 5:56 PM IST

नागरिकांनो, घाबरू नका, काळजी करू नका, सध्या आपण कोरोनाशी लढतो आहोत. संयम बाळगा, अशा शब्दांत पुरग्रस्त लोकांना धिर देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते कोल्हापूर येथील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना त्यांनी येथील लोकांशी संवाद साधला.

नागरिकांनो घाबरू नका, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांशी संवाद
नागरिकांनो घाबरू नका, काळजी करू नका, मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूरकरांशी संवाद

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहोत. कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीमध्ये काय नुकसान झाले आहे. तसेच, कुठे काय मदतीची आवश्यकता आहे. याबाबत पाहणी करण्यासाठी, तसेच येथील पुरग्रस्त नागरिकांशी संवाध साधण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे.

'काळजी करू नका'

नागरिकांनो, घाबरू नका, काळजी करू नका, सध्या आपण कोरोनाशी लढतो आहे. संयम बाळगा, अशा शब्दांत पुरग्रस्त लोकांना धिर देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कुंभारगल्लीसह इतर पूरस्थिती परिसराची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. आपण सर्व अडचणींवर मार्ग काढू अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शाहूपूरी 6 व्या गल्लीतील पूरबाधित राहिवाशांना धिर दिला. पुरामुळे बाधित झालेल्या स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आज कोल्हापूरात आले होते.

'शासनाने आम्हाला भरीव मदत करावी'

आपत्कालीनस्थितीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी खूप आधार दिल्याचे सांगून, २००५ व २०१९ पेक्षाही २०२१ साली आलेला पूर भयंकर असून शासनाने आम्हाला भरीव मदत करावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतूराज पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.

'शाहुपुरीमध्ये ठाकरे-फडणवीस आमने-सामने'

कोल्हापूरातील शाहुपुरी परिसरातील पुरस्थितीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. पाहणी झाल्यानंतर तेथून परतत असतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचाही ताफा त्याठिकाणी आला. यावेळी दोघांनीही एकमेकांची भेट घेतली. दरम्यान, दोघांमध्ये काहीवेळ चर्चाही झाली. मुख्यमंत्र्यांनी आपणही पाहणी करा, मुंबईमध्ये पुन्हा एकत्र येऊन याबाबत चर्चा करू, असे फडणवीस यांना म्हटले असल्याची माहिती समोर आली आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.