कोल्हापूर - जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून तर बुधवारी रात्री या 24 तासांमध्ये तब्बल 300 रुग्णांची वाढ झाली आहे, तर 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3039 झाली आहे, तर त्यातील 1083 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1882 झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या 24 तासांत सर्वाधिक 105 रुग्ण एकट्या कोल्हापूर शहरात आढळले आहेत. मात्र, सर्वात दिलासादायक बाब म्हणजे गगनबावडा तालुक्यात आत्तापर्यंत केवळ 7 रुग्ण आढळले आहेत.
तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या -
आजरा- 103
भुदरगड- 92
चंदगड- 324
गडहिंग्लज- 176
गगनबावडा- 7
हातकणंगले- 181
कागल- 74
करवीर- 326
पन्हाळा- 121
राधानगरी- 104
शाहूवाडी- 229
शिरोळ- 81
नगरपरिषद क्षेत्र- 687
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 482
असे एकूण 2987, इतर जिल्हा व राज्यातील 52 असे मिळून एकूण 3039 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यातील रुग्णसंख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 3039 रुग्णांपैकी 1083 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर एकूण 74 जणांचा मृत्यू झाल्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1882 इतकी आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या -
1 वर्षांपेक्षा लहान - 9 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 163 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 318 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 1820 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 622 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 107 रुग्ण
एकूण 74 मृत रुग्ण -
इचलकरंजी - 26 रुग्णांचा मृत्यू
कोल्हापूर शहर - 11 रुग्णांचा मृत्यू
हातकणंगले - 7 रुग्णांचा मृत्यू
गडहिंग्लज - 6 रुग्णांचा मृत्यू
करवीर - 6 रुग्णांचा मृत्यू
आजरा - 2 रुग्णांचा मृत्यू
शिरोळ - 2 जणांचा मृत्यू
जयसिंगपूर - 2 रुग्णांचा मृत्यू
शाहूवाडी - एका रुग्णाचा मृत्यू
पन्हाळा - एका रुग्णाचा मृत्यू
चंदगड - एका रुग्णाचा मृत्यू
भुदरगड - एका रुग्णाचा मृत्यू
हुपरी - 3 रुग्णांचा मृत्यू
इतर जिल्हा आणि राज्यातील 5 रुग्णांचा मृत्यू.