ETV Bharat / state

निदान दोन पालख्यांना पायी जाण्याची परवानगी द्या, वारकऱ्यांचा सरकारला अल्टिमेटम - वारकरी मंडळ

महाराष्ट्रातील ज्ञानोबा-तुकाराम या दोन पालख्यांना तरी पन्नास वारकऱ्यांच्या उपस्थित पायी जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी वारकरी प्रबोधन सेवा मंडळाने केली आहे. जर 25 जूनपर्यंत सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर महाराष्ट्रातील अनेक वारकरी आळंदी, देहूला हजेरी राहतील. त्यानंतरच्या परिस्थितीला पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशाराही वारकरी प्रबोधन सेवा मंडळाने दिला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2021, 6:52 PM IST

Updated : Jun 16, 2021, 10:39 PM IST

जालना - कोरोनाच्या नावाखाली आघाडी सरकारने मागच्या वर्षी वारकऱ्यांना फसवले. मात्र, यावर्षी वारकरी फसणार नाहीत. त्यामुळे आघाडी सरकारने 25 जूनपर्यंत माऊली ज्ञानेश्वर आणि माऊली तुकाराम या दोन्ही पालख्यांना प्रत्येकी पन्नास वारकऱ्यांसह घेऊन जाण्यासाठी पायी वारीची परवानगी द्यावी, अन्यथा वारकरी या दोन्ही संस्थांमध्ये दाखल होतील. याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल, असा इशारा वारकरी प्रबोधन सेवा मंडळाने आज (दि. 16 जून) जालन्यात दिला आहे.

बोलताना ह.भ.प.रमेश महाराज वाघ

मागच्या वर्षी फसवले

वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.रमेश महाराज वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आघाडी सरकारने मागच्या वर्षी ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम माऊली यांची पालखी सुरुवातीला विमानातून नेऊ, त्यानंतर हेलिकॉप्टरमधून नेऊ, असे म्हटले. मात्र, लालपरीमधून पण, तो महामारीचा काळ असल्यामुळे वारकऱ्यांनीही संयम ठेवला. प्रशासनाला मदत केली. मात्र, आता यावर्षी सर्व बाजारपेठा उद्योग व्यवसाय सुरू झालेले असताना केवळ पालखीलाच बंदी का, असा प्रश्नही वारकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

पालखी खांद्यावरच पाहिजे

पालखी ही वारकऱ्यांच्या खांद्यावरच पाहिजे तरच तिला पालखी म्हणतात. या पालखीचे भोई होण्याचे सौभाग्य मिळण्यासाठी वारकरी आयुष्यभर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतात आणि याची वाट पाहतात. महामारी असल्यामुळे वारकऱ्यांचा कोणताही अट्टाहास नाही. शासनाने किमान दोन पालख्यांना 25 जूनपर्यंत पन्नास वारकऱ्यांचासह पायी जाण्याची परवानगी द्यावी, अन्यथा एक व दोन जुलैला प्रस्थान करणार्‍या या दोन्ही पालख्यांमध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी होईल. त्यावेळी जे काही परिणाम होतील या सर्वांची जबाबदारी शासनावर असेल, असा इशाराही रमेश महाराज वाघ यांनी दिला आहे.

या वारकऱ्यांची होती उपस्थिती

वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचे संपर्कप्रमुख ह.भ.प. भास्कर महाराज हरबक, ज्ञानेश्वर महाराज जाधव, बारड महाराज, दादा पाटील महाराज, अंबादास महाराज जाधव, प्रकाश महाराज उंबरे यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचा - 'त्या' प्रकरणातील व्हायरल बनावट क्लिपची चौकशी करा - ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी

Last Updated : Jun 16, 2021, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.