ETV Bharat / state

राज्य सरकारच्या सूचना नसल्यामुळे जालन्यातील धार्मिक ठिकाणे आजही बंद - जालन्यातील मंदिरे बंद

राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना न आल्यामुळे जालना जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आजही बंद ठेवण्यात आली आहे.

jalna
राज्य सरकारच्या सूचना नसल्यामुळे जालन्यातील धार्मिक ठिकाणे आजही बंद
author img

By

Published : Jun 8, 2020, 2:39 PM IST

जालना - केंद्र सरकारने देशातील धार्मिक स्थळे आजपासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, खबरदारी म्हणून धार्मिक स्थळ बंदच ठेवण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धार्मिक ठिकाणे आजही बंदच आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजुरचा गणपती देखील याला अपवाद नाही. आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे राजूरला गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. सकाळपर्यंत मंदिरासंदर्भात कोणतेच आदेश न आल्यामुळे आजही भाविकांना मंदिराच्या शेवटच्या पायरीवरून दर्शन घेऊन परत जावे लागले. तर अनेकजण कळसाचे दर्शन घेऊन परत फिरले.

आम्ही रविवारपासून प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मात्र, अद्यापपर्यंत आम्हाला कुठल्याही लेखी सूचना मिळालेल्या नाहीत. व्यवस्थापन समितीच्यावतीने आम्ही भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहोत. मंदिर परिसरात बॅरिकेट्स सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक अंतर ठेवून दर्शन घेता येईल, यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली आहे. मात्र, सूचना न आल्याने आम्ही मंदिर उघडले नाही, असे श्री गणपती संस्थान राजूरचे अधीक्षक प्रशांत दानवे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.