जालना - औद्योगिक वसाहतीमध्ये काल (5 मार्च) ओम साईराम या लोखंडी सळ्या बनविणाऱ्या कारखान्यांमध्ये लोखंडाचे पाणी अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये कंपनीचे संचालक राजेंद्र भारूका, जवाहर डेबडा, प्रतिक गोहेल, सुनील सिंग, विनोद राय, शेख जावेद, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सहा आरोपींचा प्रत्येकी सात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
हेही वाचा - बंदूक खरी की खोटी म्हणत अचानक गोळीबार.. मित्र जखमी
अपघातामध्ये तीन कामगारांचा अंगावर लोखंडाचे वितळते पाणी पडून जागीच मृत्यू झाला होता. उर्वरीत दोन कामगारांचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये ठार झालेल्या एकूण कामगारांची संख्या पाच झाली आहे.
हेही वाचा - वाळू माफियाची पोलिसाला मारहाण, मोहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना