ETV Bharat / state

Sanjay Lakhe Patil: मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडेंचे कार्यकर्ते- मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा गंभीर आरोप - Sambhaji Bhide

Sanjay Lakhe Patil : जालन्यात मराठा आंदोलनात झालेल्या उद्रेकावरून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक संजय लाखे पाटील यांनी संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केलाय. ते म्हणाले की, मराठा आंदोलनात उद्रेक करणारे संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्यकर्ते होते. तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केलीय.

Sanjay Lakhe Patil
संजय लाखे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 7:59 PM IST

संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया

जालना Sanjay Lakhe Patil : मराठा आंदोललनात उद्रेक करणारे हे संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक व्यापक बैठक झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले, धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केलाय, असा आरोप समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केलाय. (Maratha Aandolan Jalna)

'अन्यथा' मराठा आंदोलन करतील : लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. त्यासह मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेतले पाहिजेत. गुन्हे मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलनाला बसतील, असा इशाराही मराठा समन्वयक लाखे पाटील यांनी दिलाय. (allegations on Sambhaji Bhide)

नक्की 'काय' आहे घटना : मराठा आंदोलकांवर जालन्यात पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात ही घटना घडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केलंय. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून हे उपोषण आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी उभारलेल्या मंडपात पोलीस घुसले आणि लाठीचार्ज सुरू केला. पोलिसांनी आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप केलाय. तर पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.

मराठा समाज आक्रमक : या घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झालाय. अनेक ठिकाणी मोर्चे, वाहनांची तोडफोड, जाळपोळ आंदोलकांनी केलीय. आंदोलकांनी म्हटलं आहे की, आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. परंतु पोलिसांनी आमच्या आंदोलकांना मारण्यास सुरुवात केली. सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहावं. वाहनांची तोडफोड, जाळपोळ करू नये, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

हेही वाचा :

  1. Raj Thackeray Met Maratha Protestors : लाठीचार्जचे आदेश देणाऱ्या नेत्यांना मराठवाड्यात पाय ठेऊ देऊ नका; राज ठाकरे आक्रमक
  2. Maratha Morcha Baramati: अजित पवारांचा पेच आणखीनच वाढला; सरकारमधून बाहेर पडण्याचं बारामतीकरांचं आवाहन
  3. Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक; उपमुख्यमंत्र्यांची आंदोलकांसोबत चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.