जालना: कृषीमंत्री अब्दुल सत्तार (agiculture minister abdul sattar) यांनी जालन्यातील हिंदूगर्वगर्जना कार्यक्रमात (Hindu pride event in Jalana) धक्कादायक विधान केलं. उध्दव ठाकरेंनी (uddhav thackeray) एकनाथ शिंदेंचं (cm eknath shinde) नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं. अन्यथा ठाकरेंची शिवसेना दुर्बिणीने पाहावी लागेल (ShivSena will have to watch through binoculars) अस वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (agiculture minister abdul sattar)यांनी जालन्यातील एका कार्यक्रमात केलं आहे.
चंद्रकांत खैरेंवर मिश्कील टिप्पणी चंद्रकांतं खैरे (chandrakant khaire) यांना गणिताची टोटलच कळत नाही. असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केली आहे. यामुळे खैरे-सत्तार संघर्ष (Khare Sattar conflict) पुन्हा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याबद्दल बोलण्यास सत्तार यांनी मात्र नकार दिला.
अशोक चव्हाणांसोबत सत्ता स्थापनेची विनंती करण्यासाठी आम्हीच एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलो होतो. अशी प्रतिक्रीया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे हे युपीएच्या काळात आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी आले होते. असा गौप्यस्फोट अशोक चव्हाणांनी केला होता. त्यावर सत्तार यांनी म्हटलंय की मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो. आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो. असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केलीये.