जालना - कर्ज घेऊन खरेदी केलेल्या वाहनांचे हप्ते थकल्यामुळे त्यांना फसवणाऱ्या चंदंनझीराला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून सुमारे 27 लाख रुपये किंमतीची सहा वाहने देखील जप्त केले आहेत.
हेही वाचा - देवळा बनावट मुद्रांक प्रकरण : मुख्य सूत्रधार वाघ अखेर ताब्यात
अशी करायचा फसवणूक
वाहनचालकांना एक रकमी वाहन खरेदी करणे शक्य नसल्यामुळे ते पतपुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे कर्ज घेऊन हे वाहन खरेदी करायचे. दरम्यानच्या काळात टाळेबंदी असल्यामुळे अशा वाहनांच्या व्यवसायाला आळा बसला आणि पतसंस्थांचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. अशा वाहनचालकांना हा महाठग शोधून काढायचा आणि त्यांच्याकडून हप्त्याच्या थकलेल्या उर्वरित रकमेपैकी काही रक्कम देऊन वाहन खरेदी करायचा . उर्वरित रक्कम वाहन नावावर करून घेताना देण्याचा करार करायचा. असाच करार त्याने जालन्यातील रामचंद्र उजेड यांच्यासोबत केला होता. उजेड यांची मालवाहू गाडी एम एच 48- 44 75 हे वाहन पाच लाख 50 हजार रुपयात खरेदी करण्याचा व्यवहार ठरला .त्यापैकी औरंगाबाद येथे बायजीपुरा भागात राहणाऱ्या बबलू सेठ उर्फ शेख नाजीम शेख चांद याने उजेड यांना एक लाख रुपये देऊन वाहन घेऊन गेला. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी शेख नजीम याचा पाठपुरावा करण्यासाठी रामचंद्र उजेड यांनी मोबाईल लावला आणि संबंधितांनी दिलेल्या पत्त्यावर देखील भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पत्ता चुकीचा दिसला आणि मोबाईलही बंद आला. त्यामुळे उजेड यांनी चंदंनाझीरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली .आणि या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून नवीन एका सौदयासाठी जालना शहरात औरंगाबाद चौफुलीवर शेख नदीम शेख चांद आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
सर्व वाहने मालवाहू
फसवणूक झालेल्या वाहनधारकांमध्ये विशेष बाब म्हणजे ही सर्व वाहने मालवाहू आहेत ,शेती व्यवसायाशी निगडित आहेत. टाळे बंदीच्या काळात ही सर्व वाहने जागीच उभी असल्यामुळे हप्ते भरणे शक्य झाले नव्हते. अशा वाहन मालकांना हा भामटा फसवायचा.
अशी होती साखळी
एखाद्या वाहनधारकांकडून पाच लाखात खरेदी केलेले वाहन तो दुसऱ्या व्यक्तीला चार लाखात विकायचा ज्याने चार लाखात खरेदी केले आहे. त्याने पुढे तीन लाखात विकायचे, अशा पद्धतीने या माहाठगांची टोळी आहे .त्यामुळे वाहनधारक यांच्या पर्यंत पोहोचू शकत नव्हते. शेवटी ज्याने वाहन खरेदी केले त्याचे मात्र आर्थिक नुकसान झाले आहे. तूर्तास पोलिसांनी सहा वाहने जप्त केली आहेत.
हेही वाचा - नोकिया १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार; 5 जी तंत्रज्ञानावर करणार लक्ष्य