जालना - येथील वडीगोद्री गावात भगर खाल्ल्याने ३ दिवसांत १४ नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यातील १२ नागरिकांना उपचारानंतर दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असून, तर, त्यातील दोन नागरिकांवर आणखी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. परवा, ७, काल ६ आणि आज पुन्हा एका नागरिकाला भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. सध्या नवरात्रीत उपवास सुरू आहेत. या घटनेमुळे उपवास धरणाऱ्यांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी भगर खाल्ल्याने ४५ वर्षीय सौमित्रा काळे या महिलेला विषबाधा झाली असून, त्यांच्यावर वडीगोद्रीतील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, औषध व प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी दोन किराणा दुकानांमधून ३८ किलो भगर जप्त केली आहे. तसेच, या भगरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
भगर खाल्ल्याने तीन दिवसांत 14 नागरिकांना विषबाधा, नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण