ETV Bharat / state

कोरोना लढ्यातील सैनिकांवर पुष्पवृष्टी; गावकऱ्यांनी मानले आभार - जालना संचारबंदी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर यांचे गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. गावकऱ्यांनी निर्णय घेतला की रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करावे. गावकरीदेखील तुमच्या कार्यात साथ देणार हा आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यामागची भूमिका.

कोरोना लढ्यातील सैनिकांवर पुष्पवृष्टी; गावकऱ्यांनी मानले आभार

author img

By

Published : Apr 25, 2020, 9:28 PM IST

जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर यांचे गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व डॉक्टर, कर्मचारी हे जागरूकतेने काम करीत आहेत. सोबतच या कोरोनाच्या लढाईत वालसा, कोळेगाव, गोद्री, निंबोळा, वडशद, दानापूर, भायडी, तळणी, विरेगाव आदी गावात जनजागृती करत आहेत. त्यामुळे कोरोनाचे भय निघून गेले असून त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणून गावकरी तशी काळजी घेत आहेत.

कोरोना लढ्यातील सैनिकांवर पुष्पवृष्टी; गावकऱ्यांनी मानले आभार

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून गावातील व्यवहार सुरुळीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने गावकऱ्यांना धीर मिळाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करावे. गावकरीदेखील तुमच्या कार्यात साथ देणार हा आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यामागची भूमिका. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राऊत, डॉ. शिंदे, डॉ. फदाट, ANM खेसर मॅडम, आशा वर्कर मनीषा सुरडकर या सर्वांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी जिल्हापरिषद सदस्य केशव पाटील जंजाळ, पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील देठे, माजी सरपंच पंडित पाटील, डॉ. ईश्वर वाघ यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी या कौतुक सोहळ्यात सामील झाले होते.

दरम्यान, कोरोनाच्या लढाईत 24 तास काम कारणाऱ्या डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावकरी साथ देतात व त्यांच्या सेवेचे कौतुक करतात हा पायंडा या गावाने पाडून दिला. कोरोना लढ्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत हे दाखवून दिले आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आदी शासनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे यावेळी आवाहन करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.