ETV Bharat / state

जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाची डोक्यात दगड घालून हत्या, कारण अस्पष्ट - murder news jalna

काशिनाथ गोरे हे काल रात्री 10 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंठा रस्त्यावर असलेल्या कोठारी हिल्सनजीकच्या शेत आखाडयावर झोपण्यासाठी गेले होते. मात्र, रात्री त्यांचा अज्ञात व्यक्तीने खून केला. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ एक मोठा दगड आढळून आला आहे.

जालन्यात शेतात झोपलेल्या वृद्धाचा डोक्यात दगड मारुन खून
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:56 PM IST

Updated : Sep 6, 2019, 6:33 PM IST

जालना- राममूर्ती शिवारात शेत आखाड्यावर झोपलेल्या वृद्ध शेतकऱ्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली घडली आहे. काशिनाथ पुंजाजी गोरे (वय ७५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा-जालन्यात आठ दिवसांपासून रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

काशिनाथ गोरे हे काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंठा रस्त्यावर असलेल्या कोठारी हिल्सनजीकच्या शेत आखाडयावर झोपण्यासाठी गेले होते. मात्र, रात्रीत त्यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ एक मोठा दगड सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, शीघ्र कृती दलाचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.

Intro:

शेतआखाड्यावर झोपलेल्या वृद्ध शेतकऱ्याचा डोक्यात दगड मारून खून

जालना शहरापासून 5 किमी. अंतरावर असलेल्या राममूर्ती शिवारातील खळबळजनक घटना घडली आहे.
राममूर्ती येथील काशीनाथ पुंजाजी गोरे (वय ७५) हे काल रात्री 10 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे मंठा रस्त्यावर असलेल्या कोठारी हिल्सनजीकच्या शेत आखाडयावर झोपण्यासाठी गेले होते.
आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाजवळ एक मोठा दगड आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, शीघ्र कृती दलाचे पोनि. यशवंत जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोनि. सुरेंद्र गंदम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.Body:सोबत फोटोConclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.