ETV Bharat / state

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन; महिला आघाडीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शहरातील डॉक्टर अधिकारी, पोलीस अधिकारी, सफाई कामगार यांचा गौरव करण्यात आला. तर कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या महिलांचा मर्दानी महाराष्ट्राची हे सन्मानचित्र देऊन सत्कार करण्यात आला.

Jalna
मास्क वाटप करताना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या
author img

By

Published : Jun 10, 2020, 3:18 PM IST

Updated : Jun 10, 2020, 4:45 PM IST

जालना - भोकरदन शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने शहरातील डॉक्टर अधिकारी, पोलीस अधिकारी, सफाई कामगार यांचा गौरव करण्यात आला. तर महिलांचा "मर्दानी महाराष्ट्राची" हे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकात दानवे यांच्या माध्यमातून विविध उपक्रम घेवून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रवादीचा वर्धापन दिन; महिला आघाडीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सोशल डिस्टन्सचे पालन करून महिला आघाडीतर्फे होमिओपॅथी आर्सेनिक 30 औषधी आणि मास्क वाटप करण्यात आले. शहरातील पोलीस अधिकारी शिल्पा इंगळे, डॉक्टर सविता म्हेत्रे, ग्रामसेविका पुनम जाधव , आशावर्कर संगीता जंजाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या डॉक्टर सुनिता सावंत यांच्या हस्ते "मर्दानी महाराष्ट्राची" हे सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. सुनीता सावंत, कमलबाई जेठे, वंदना हजारे, नगरसेविका निर्मला भिसे, सोनाबाई कोल्हे आदी उपस्थिती होती.

Last Updated : Jun 10, 2020, 4:45 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.