ETV Bharat / state

Manoj Jarange Press Conference: पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणात मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप, म्हणाले...

Manoj Jarange Press Conference: मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती आता ढासळलीय. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट केलीय.

Manoj Jarange Press Conference
मनोज जरांगे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 6:05 PM IST

Updated : Sep 6, 2023, 6:42 PM IST

आंदोलनातील जखमींवर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

जालना Manoj Jarange Press Conference: जालना Manoj Jarange Press Conference: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मनोज जरांगे म्हणाले, सामूहिक कट रचून अधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. यापूर्वी मराठा आंदोलन शांततेत झाले. शासकीय कामात अडथळा अशी गुन्हे लावण्यात आली आहेत.ओबीसी आणि मराठ्यांनी समन्वयाने वागावे. आपण एकदिलानं राहू. एकमेकांवर चिखलफेक करू नये.

पुरावे तयार आहेत- हैदराबादपासूनचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. एका दिवसात अध्यादेश काढता येईल, एवढे सरकारला पुरावे देतो. राज्यपालांची परवानगी घेऊन राज्य सरकारनं अध्यादेश काढावा. जनतेनं लक्ष घ्यावे, पुरावे तयार आहेत. कुठे फिरण्याची गरज नाही. सरकारला तज्ज्ञ द्यायला तयार आहोत. राज्य सरकारनं विनंती मान्य करून आरक्षण द्यावे.

सरकारनं न्याय द्यावा- आम्ही वेठीस धरण्यासाठी आंदोलन करत नाही. कायदा करण्यासाठी सर्व पुरावे देऊन सपोर्ट करत आहोत. सरकारचा वेळ वाचवित आहोत. सरकारला कारण सांगण्यासाठी ठेवलेले नाही. हे आंदोलन लांबवायचे नाही व चिरडायचे नाही, अशी भूमिका घेत सरकारनं न्याय द्यावा. सरकारचे शिष्टमंडळ येईल, याची अपेक्षा करत नाही. गरिबाचे लेकरं आंदोलन करत आहेत. यात राजकारण नाही, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

जखमी झालेल्या आंदोलकांची भेट : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिलीय. आंतरवली सराटी येथील आंदोलनातील जखमी झालेल्या आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीय. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीय. आंतरवली येथील घटनेत पोलीस कर्मचाऱ्यांसह आंदोलक महिला, पुरूष जखमी झालेत. या सर्व जखमींवर जालन्यातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी रूग्णांची आज राज्यांचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलीय.

अवफांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन : या घटनेत जखमी असलेल्या एका महिला पोलिस कर्मऱ्यांचा काल मृत्यू झाल्याची बातमी समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. त्या महिलेची आज अतिरिक्त पोलीस महासंचालक यांनी भेट घेतलीय. तिची प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलंय. कोणीही अवफांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय. यावेळी औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जालन्याचे पोलीस आधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित (Maratha Protest) होते.

आंदोलनातील लाठीमारची चौकशी : आंतरवली सराटी येथे झालेल्या लाठीमारची चौकशी अप्पर पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे. त्या अनुषंगानं या पथकानं आज सकाळी आंतरवली सराटी या गावात भेट दिली. त्यानंतर हे पथक आज दुपारी जालना येथील सामान्य रुग्णालयात आलं होतं. त्यांनी यावेळी जखमी पोलीस व आंदोलक महिला, पुरुष यांची भेट (Manoj Jarange health) घेतलीय.

हेही वाचा :

  1. Arjun Khotkar On Manoj Jarange Patil : समाजाचं भलं करायचं असेल, तर काही गोष्टी ऐकाव्या लागतात... अर्जुन खोतकर
  2. Maratha Reservation Live Updates : फडणवीस यांच एवढं तोकडे ज्ञान असेल असं वाटल नव्हतं- उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  3. Prakash Ambedkar on Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा, घेतली मनोज जरांगेंची भेट

Last Updated : Sep 6, 2023, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.