जालना - दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालन्यात देखील आंदोलन सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जागरण गोंधळ आणि किर्तन,पोवाडा सादर करून आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
केंद्र सरकारने पास केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांची आहे. सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून रोखण्यासाठी पाण्याचे फवारे मारण्यात येत असून रस्तेही खोदून ठेवण्यात आले आहेत. सरकारच्या या कृतीचा काळे यांनी निषेध केला.
पोवाड्याचा आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम
कीर्तनकार शिवाजी महाराज भोसले आणि शाहीर आप्पासाहेब उगले यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आंदोलन स्थळी होणार आहे. सुरेश गवळी, साईनाथ चिंनदोरे, नामदेव खोसे, गणेश गावडे, ताराचंद पवार, अंकुशराव तारक, बाबासाहेब दखणे, दिगंबर तारक, अशोक गायकवाड आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.