जालना - देऊळगाव राजा येथून परभणीकडे कत्तलीसाठी नेण्यात येणारे चार बैल आणि एक गाय वासरू बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदतीने पकडले आहेत. याप्रकरणी तीन जणांवर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पकडलेल्या जनावरांना चारा पाण्याची आवश्यकता असल्याने जालन्यातील महावीर स्थानकवासी जैन गोशाळेत त्यांना सोडण्यात आले.
हेही वाचा - शरजीलला समर्थन देणाऱ्या आंदोलकांविरोधात भाजपची मुंबई पोलिसात तक्रार
बजरंग दलाचे शहर प्रमुख चेतन वर्मा यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने फोन करून मंठा रोड, सिंधी काळेगाव पाटीजवळ वाहनात कोंबलेल्या जनावरांविषयी माहिती दिली. त्यानंतर वर्मा यांनी ही माहिती तालुका पोलिसांना ही माहिती सांगितली. दरम्यान वर्मा हे सिंधी काळेगाव पाटीजवळ पोहोचल्यानंतर तिथे वाहनामध्ये (क्रमांक- एमएच 28 बीबी 1958) जनावरे अस्ताव्यस्त कोंबल्याचे दिसून आले. ही माहिती मिळाल्यानंतर तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई तराळ आणि मुंडे देखील तेथे पोहोचले. यावेळी या वाहनात एक लाख वीस हजार रुपये किंमतीचे चार बैल, पंचवीस हजार रुपये किमतीची एक गाय, आणि दहा हजार रुपये किमतीचे एक वासरू, यासह तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण चार लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
वाहनचालक गजानन रामचंद्र शेळके (राहणार सरंबा, तालुका देऊळगाव राजा, बुलढाणा) व त्याच्या सोबतचे साथीदार शेख शब्बीर शेख शौकत (वय-22), शौकत कुरेशी (वय-27) दोघेही (राहणार देऊळगावमही, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा) या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून एकाला दीड कोटींना लुटणारी 'बंटी-बबली' जोडी ताब्यात