जालना - अन्य वेळी कडक भूमिका बजावत लाठीचा प्रसाद देणाऱ्या पोलिसांना देखील कोरोना उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वसामान्य बद्दल प्रेम आणि जिव्हाळा उत्पन्न झाला आहे. त्यामुळे हातातली काठी बाजूला ठेवून धान्य वाटपाच्या पिशव्या हातामध्ये घेतल्या आहेत.
चंदणझिरा पोलीस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच अधिकारात येत असलेल्या सुंदरनगर भागामध्ये गरीब जनतेसाठी धान्याचे वाटप सुरू केले आहे. तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्यांनी या भागातील काही तृतीय पंथी आणि काही गरीब ज्यांचे हातावर पोट आहे. अशांना हे धान्याचे पाकीट वाटप केले आहे. त्यांना सहाय्यक म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले ,हवलदार रामकिसन वाघमारे ,अनिल काळे ,अजय पोके ,महिला पोलीस कर्मचारी रेखा लाटाई, पोलीस मित्र गणेश शेळके ,अक्षय मोरे, हे मदत करीत आहेत.
काय आहे पाकिटामध्ये
गहू पाच किलो,तांदूळ दोन किलो, साखर एक किलो, मीठ एक किलो, सोयाबीन, शेंगदाणा तेल प्रत्येकी अर्धा किलो.
तुरदाळ 100 ग्राम, चहा पावडर पाव किलो, चटपटीत मसाला 200 ग्राम, हळद पुडी, लाल तिखट प्रत्येकी शंभर ग्राम, जिरे पन्नास ग्राम, पॅराशुट तेल 100 ग्राम, पार्ले बिस्कीट पुडा, मोनॅको बिस्किट पुडा प्रत्येकी एक, डेटॉल साबण एक.