ETV Bharat / state

...म्हणून एकदा पंढरीची वारी करा - हलीमा कुरेशी

वारीत फक्त टाळ न वाजवता डोळे उघडे ठेवून सजगतेने अनेक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत, असे आवाहनही हलीमा कुरेशी यांनी केले.

author img

By

Published : Feb 3, 2020, 7:50 AM IST

Updated : Feb 3, 2020, 8:38 AM IST

बोलताना हलीमा कुरेशी
बोलताना हलीमा कुरेशी

जालना - महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली समता पाहायची असेल तर एक वेळा का होईना पंढरीची वारी करा, असा सल्ला हलीमा कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. जेईएस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात चौथे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

जेईएस महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हलीमा कुरेशी

वारी समतेची या विषयावर बोलताना हलीमा कुरेशी म्हणाल्या, की महात्मा गांधींना जी समता अभिप्रेत होती, त्यांचे सर्व समाजाविषयीचे विचार काय होते? आणि आज ते कसे अस्तित्वात आहेत हे पाहायचे असेल, तर पंढरीची वारी करा. महात्मा गांधींनी खऱ्या हिंदू धर्माचे पालन केले आणि आपणही आपला धर्म पाळला पाहिजे. मात्र, आपल्या धर्माची तत्वे अंधपणाने मान्य करू नका, असे आवाहनही त्यांनी केले. पंढरीच्या वारीचे वृत्तांकन करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी कथन केले. भागवत संप्रदाय कोणतीही विषमता मानत नाही आणि त्यामुळेच या वारीमध्ये सर्व जाती धर्म एकत्र आल्याचे पाहायला मिळतात. वारीमध्ये फक्त टाळ न वाजवता डोळे उघडे ठेवून सजगतेने अनेक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत, असे आवाहनही हलीमा कुरेशी यांनी केले.

हेही वाचा - 'हिरोईन म्हणजे नायिका', बबनराव लोणीकरांनी केले स्वत:च्या वक्तव्याचे समर्थन

या कार्यक्रमाला जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनूने, सहसंचालक महावीर सदावर्ते, सेवाग्रामचे कार्यकर्ते मनोज ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांमधून आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला सुरुवात

Intro:महात्मा गांधींना अभिप्रेत असलेली समता पहायची असेल तर एक वेळा का होईना पंढरीची वारी करा !असा सल्ला बीबीसी मराठी पुण्याच्या पत्रकार हलीमा कुरेशी यांनी विद्यार्थ्यांना दिला.जेईएस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 16 व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात चौथे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

Body:"वारी" समतेची या विषयावर बोलताना हलीमा कुरेशी म्हणाल्या, की महात्मा गांधींना जी समता अभिप्रेत होती, त्यांचे सर्व समाजाविषयी चे विचार काय होते ?आणि आज ते कसे अस्तित्वात आहेत हे जर पहायचे असेल तर एक वेळा पंढरीची वारी करा. म. गांधींनी खऱ्या हिंदू धर्माचे पालन केले. आणि आपण आपला हि धर्म पाळला पाहिजे. मात्र आपल्या धर्माची तत्वे अंध पणाने मान्य करू नका असे आवाहनही त्यांनी केले. पंढरीच्या वारीचे वृत्तांकन करताना आलेले अनुभवही त्यांनी यावेळी कथन केले. भागवत संप्रदाय कोणतीही विषमता मानत नाही आणि त्यामुळेच या वारीमध्ये सर्व जाती धर्म एकत्र आल्याचे पाहायला मिळतात. वारीमध्ये फक्त टाळ न कुटता डोळे उघडे ठेवून सजगतेने अनेक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. असे आवाहनही हलीमा कुरेशी यांनी केले .
या कार्यक्रमाला j.e.s. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा ,म गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ.यशवंत सोनूने. सहसंचालक महावीर सदावर्ते ,पत्रकार राही ,सेवाग्राम चे कार्यकर्ते मनोज ठाकरे यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठांमधून आलेले विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 8:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.