ETV Bharat / state

जालन्यात शॉर्टसर्किटने लागली घराला आग... 60 खण माळवद जळून खाक - जालना बातमी

गावकऱ्यांनी तत्काळ परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. दरम्यान, गावकऱ्यांनी सुद्धा आपापल्यापरीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात 60 खन माळवद जळून खाक झाले आहे.

fire-breaks-out-at-home-in-jalna
जालन्यात शॉर्टसर्किटने लागली घराला आग...
author img

By

Published : Feb 20, 2020, 9:42 PM IST

जालना- मंठा तालुक्यातील अंभोडा कदम येथे लागलेल्या आगीत पन्नास ते साठ खण लाकडी माळवद जळून खाक झाले आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून चेअरमन बाळासाहेब बोराडे यांचे हे घर आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा- चलनाचे अवमूल्यन! डॉलरच्या तुलनेत २६ पैशांच्या घसरणीनंतर रुपया ७१.८० वर

आज (गुरुवारी) सकाळी दहा वाजता अचानक ही आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केला. गावकऱ्यांनी तत्काळ परतूर, सेलू, जिंतूर आणि जालना येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. दरम्यान, गावकऱ्यांनी सुद्धा आपापल्यापरीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीत घरातील कपडे, धान्य, इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या. तहसीलदार सुमन मोरे, पोलीस निरिक्षक विलास निकम, तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केली. यामध्ये देविदास बोराडे, परमेश्वर बोराडे, भारत बोराडे, शिवाजी बोराडे, बाळासाहेब गोरे, राधाकिसन बोराडे, भानुदास बोराडे, संपत राठोड, उत्तम ढाकरके यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.