जालना - मागील लेकसभा निवडणुकीमध्ये मोदींची लहर होती. त्यामुळे भाजप सरकार आले, आता मोदींचा कहर झाल्यामुळेच हे भाजप सरकार जाऊन काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला.
जालना शहरातील महेश भवन येथे काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास अवताडे यांच्या बैठकीच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शिवसेनेचा एखादा गट नव्हे तर पुर्ण शिवसेना नाराज आहे. शिवसैनिक नाराज असल्याने याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे.