ETV Bharat / state

अखेर ४१ तासाने मिळाला मृतदेह, गावकऱ्यांची 'समृद्धी' ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराने दुधना नदीच्या पात्रात केलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ३ ऑक्टोबरला घडली. त्याचा मृतदेह हा ४१ तासानंतर मिळाला. यानंतर समृद्धीच्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार नारायण कुचे यांनी केली आहे.

'समृद्धी' ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

author img

By

Published : Oct 5, 2020, 7:30 PM IST

जालना - जालना तालुक्यातील अकोला शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीत समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने ५० ते ७० फूट खोल खड्डे करून मुरुम उपसा केला. यामुळे पावसाळयात या खड्ड्यात पाणी साठून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन दिवसांपूर्वी बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह आज (सोमवार) ४१ तासानंतर मिळला. तर, गुन्हा दाखल करून मृतांच्या नातेवाईकांना मदतीचे आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिल्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला होता. यानंतर समृद्धीच्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला मदत मिळवून देण्याची मागणी आमदार नारायण कुचे यांनी केली आहे.

'समृद्धी' ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

बदनापूर तालुक्यातून समृद्धी महामार्ग गेलेला असून त्याचे काम एका खासगी कंपनीने घेतलेले आहे. अकोला शिवारातून वाहणाऱ्या दुधना नदीतील खोलीकरणाच्या नावाखाली या कंत्राटदारांनी मोठमोठे खड्डे केले. वास्तविक पाहता दुधना नदीत जलसाठा वाढावा व खोलीकरण व्हावे या दुहेरी उददेशाने गावातील ग्रामपंचायतने २० फूटापर्यंत खोलीकरण करण्यास परवानगी दिलेली होती. असे असताना सदर ठेकेदाराने अवैधरित्या खोदकाम करून गौण खनीज (मुरूम) मिळविण्यासाठी दुधना नदीपात्रात ५० ते ७० फूटापर्यंत मोठे खड्डे केले.

पावसाळयात या नदीला पाणी आल्यानंतर या खड्डयात प्रचंड पाणीसाठा झाला. त्यातच जून महिन्यात एका दहावीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी बदनापूर पोलिसांत संबंधित ठेकेदारावर गुन्हेही नोंद करण्यात आली असून संबंधित ठेकेदाराचा अटकपूर्व जामिनही न्यायालयाने फेटाळलेला आहे. ३ ऑक्टोबर रोजी अकोला येथील पांडूरंग मुंढे (वय ३८) या व्यक्तीचा शेतात जात असताना पाय घसरून पडल्याची घटना उघडकीस आली. त्याचा मृतदेह अग्निशमन दल, स्थानिक तरुणांच्या मदतीने शोधकार्य घेत असताना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी मिळाला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, जोपर्यंत कंत्राटदारांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला. तर, बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन समृद्धी महामार्गाचे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करून त्वरित अटक करावी अशी मागणी केली. तसेच, मृत्यू झालेल्या दोन्ही व्यक्तींच्या परिवारास समृद्धी महामार्ग यांच्याकडून प्रत्येकी २५ लक्ष रुपये मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच शासनातर्फेही आपत्कालीन मदत देण्याची कारवाई प्रशासनाने करावी, अशी मागणी केली. अखेर प्रशासनाने मदतीचे व उचित कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह दुपारी ३ वाजेनंतर ताब्यात घेण्यात आला.

समृद्धीचे काम करणाऱ्या मोंटे कार्ला कंपनीवर अवैध उत्खनन करून दुधना नदीपात्रात मोठमोठे खड्डे केल्यामुळेच त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, कंपनीविरोधात गुन्हा नोंद करून तत्काळ मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामीण रुग्णालय परिसरातच आमदार नारायण कुचे, भरत सांबरे व सर्व गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात न घेता ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आमदार नारायण कुचेसह, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण, भानुदास घुगे, गजानन गिते, भरत सांबरे, बाबासाहेब सानप आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा - दुधना नदीपात्रात "समृद्धी"ने केलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.