ETV Bharat / state

भोकरदन-जालना मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार - जालना अपघात ताजी बातमी

रविवारी सकाळी 6 ते साडेसहाच्या सुमारास कैलास राऊत हे त्यांच्या हिरो होंडा दुचाकीने जालन्याकडे जात होते. दरम्यान, जालन्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार घडक दिली. या घटनेत राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

भोकरदन-जालना रोडवरील बरंजला पाटीसमोर ट्रकची दुचाकीला धडक

author img

By

Published : May 3, 2020, 3:12 PM IST

Updated : May 3, 2020, 3:44 PM IST

जालना - येथे भोकरदन-जालना रोडवरील बरंजला पाटीसमोर एका भरधाव ट्रकने (केए- २८, डी ९००५) एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी 6 ते साडेसहाच्या सुमारास भोकरदन ते जालना रोडवरील बरंजळापाटी ते डावरगावपाटी दरम्यान घडलीय कैलास दगडू राऊत (वय ४५) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कैलास राऊत
कैलास राऊत

माहितीनुसार, रविवारी सकाळी 6 ते साडेसहाच्या सुमारास कैलास राऊत हे त्यांच्या हिरो होंडा दुचाकीने जालन्याकडे जात होते. दरम्यान, जालन्याकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार घडक दिली. या घटनेत राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.

भोकरदन-जालना मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक

सदर घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौकशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका मिलिंद सुरडकर हे करत आहेत.

दरम्यान, मृत कैलास राऊत यांच्यानंतर पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा आप्त परिवार आहे. राऊत हे घरातील एकमेव कमवते व्यक्ती होते त्यांच्या या दुर्दैवी अपघात झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Last Updated : May 3, 2020, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.