ETV Bharat / state

बदनापूरच्या तहसीलदारांनी केला रेड झोनमधून प्रवास; कारवाई कोण करणार?

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महारार्ष्ट शासनाने जिल्हा बंदी केल्या आहेत. जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कठोर परिश्रम घेऊन जालना जिल्ह्यात कारोनाला हातपाय पसरू दिलेले नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र कोरोनाने हाहाकार माजला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांनी आदेश काढून रेड झोनमध्ये असलेल्या शहरातून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जाणे येणे करू नये, असे आदेश काढलेले होते.

बदनापूरच्या तहसीलदारांनी केला रेड झोनमधून प्रवास

author img

By

Published : Apr 29, 2020, 1:21 PM IST

जालना - कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून रेड झोनमधील कोणालाही प्रवेश देऊ नये. असे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांनी दिले होते. असे असतानाही बदनापूर येथील काही अधिकारी कर्मचारी औरंगाबादहून जाणे-येणे करत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. तालुक्यात वरूडी येथे चेक पोस्ट असून या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असताना व या ठिकाणाहून पास असलेल्या वाहनांनाच सोडण्यात येते. तरी देखील काही छुप्या रस्त्याने ही वाहतूक होत असल्याचेही दिसून येत आहे. आज तर बदनापूरच्या तहसीलदारच रेड झोनमधून आल्याचे अनेकांनी पाहिले असल्याचे सांगत आहेत.

चेक पोस्ट येथील परिस्थिती

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महारार्ष्ट शासनाने जिल्हा बंदी केल्या आहेत. जालना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी कठोर परिश्रम घेऊन जालना जिल्ह्यात कारोनाला हातपाय पसरू दिलेले नाहीत. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र कोरोनाने हाहाकार माजला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक जालना यांनी आदेश काढून रेड झोनमध्ये असलेल्या शहरातून कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जाणे येणे करू नये, असे आदेश काढलेले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी तर काही अधिकारी कर्मचाऱ्यांना थेट नोटीसा दिलेल्या होत्या. त्यानंतरही बदनापूर तालुक्यातील कर्मचारी अधिकाऱ्यांचे अपडाऊन सुरूच असल्याचे दिसून येते. बदनापूरच्या तहसीलदार मागील 7 दिवसांपासून सुटीवर असल्याची प्राथमिक माहिती होती. त्या आज बदनापूर शहरात दाखल झाल्या. त्या वरूडी येथील चेकपोस्टवरून त्यांच्या खासगी वाहनाने स्वतः वाहन चालवत एकटया सोशल डिस्टन्सिंग ठेवून चेकपोस्टमध्ये दाखल झाल्या. या ठिकाणी तपासणी केल्यानंतर त्यांचे वाहन सोडण्यात आले. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून काही परवाना धारक वाहनेही सोडण्यात येत असतानाच कित्येक वाहने मात्र थांबवून परत पाठवण्यात येत होती. असे असतानाही शहरात मात्र जाणे येणे करणारे मोठया संख्येने दिसून येत आहेत.

चेक पोस्ट येथील परिस्थिती

वरूडी येथील चेक पोस्टवर काटेकोरपणे तपासणी होत असल्यामुळे मोठया संख्येने औरंगाबादहून जाणेयेणे करणारे लोक हे छुप्या रस्त्याचा वापर करत आहेत. वाकुळणी मार्गे एक दुर्लक्षित रस्ता आहे. तर समृध्दी महामार्गानेही औरंगाबादकडे जाता येते. त्याचप्रमाणे रेल्वे लाईनच्या बाजूला असलेल्या रस्त्याचाही लोक हा चेक पोस्ट टाळण्यासाठी उपयोग करत आहेत. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन मोठया मेहनतीने काम करत असताना चेक पोस्टवरही काटेकोरपणे नियमाप्रमाणे वाहने अडव्ण्यात येत असतानाही काही कर्मचारी, अधिकारी अशा छुप्या रस्त्यांचा वापर जिल्ह्यात येण्यासाठी करत असल्यामुळे रेड झोनमधून येणे जाणे करणारे हे अधिकारी जालनासाठी अडचणीचे ठरू शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.