जालना - जालन्यातील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये एका कामगाराचा अपघाती मृत्यु झाला आहे. गजकेसरी या लोखंडी सळया तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये क्रेनचे हुक तुटुन अपघात घडला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
गजकेसरी कंपनीतील घटना
औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी सळया तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यापैकीच गजकेसरी या कंपनीमध्ये बुधवारी सायंकाळी तयार झालेल्या सळया उचलून ट्रकमध्ये टाकण्यासाठी उचलल्या होत्या. क्रेनच्या साह्याने या ट्रकमध्ये भरण्यात येत होत्या. त्यावेळी क्रेनचे हुक तुटले आणि या सळया त्या खाली काम करत असलेल्या कामगारांवर कोसळल्या. यात भरत गणेश इंगळे यांचा शरीरात सळया घुसल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन कामगार संजू शिवाजी राठोड आणि अमोल पांडुरंग इंगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत चंदंजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.