ETV Bharat / state

जळगावात अवकाळी पावसाने केले केळीसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान, ३० हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका - untimely rain crop affect jalgaon

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सलग दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने हजेरी लावली होती. त्यासोबतच झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

untimely rain jalgaon
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावासमुळे वाकलेले पीक
author img

By

Published : Mar 19, 2020, 5:23 PM IST

जळगाव- जिल्ह्यात सलग २ दिवस वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे ३० हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका बसला आहे. यात ९ तालुक्यांमधील २९४ गावांवर संकट कोसळले आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांसह केळी व इतर पिकांचे ३० हजार २६० हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

गेले २ दिवस सलग जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. पावसासोबत गारपीट देखील झाल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. जळगाव तालुक्यातील भोकर, घार्डी, भादली खुर्द यासह परिसरातील गावांमध्ये रब्बी पिकांसह केळी व इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. लोकांच्या घरावरील पत्रेही उडाली आहेत.

त्याचप्रमाणे चोपडा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर आणि यावल तालुक्यात देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात झालेल्या या नुकसानीबाबत कृषी विभागातर्फे शेतात जावून पंचनामे करण्यात आले आहेत. त्यानुसार प्राथमिक नुकसानीचा अहवाल बनवून जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना सादर केला आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे २९४ गावांमधील ३१ हजार ११७ शेतकरी बाधित झाले आहेत. जळगावसह यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, धरणगाव व चोपडा तालुक्यांना- सर्वाधिक फटका बसला आहे.

केळीचे साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील केळीचे साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी ज्वारी २ हजार ९११, गहू ६ हजार ७७७, मका ७ हजार १००.७५, बाजरी १ हजार ८५०.६०, हरभरा ३ हजार ४१३, कांदा १ हजार २४६.२०, फळपिके १५८.१, इतर ८७७.४०, भाजीपाला ५५.८० असे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

चोपडा तालुक्याला सर्वाधिक फटका

चोपडा तालुक्यात सर्वाधिक १६ हजार १९ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले असून त्या खालोखाल जळगाव तालुका ७ हजार ८२६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव तालुक्यात १ हजार ४९ हेक्टर गहू, १२३० हेक्टर मका, ७७२ हेक्टर रब्बी ज्वारी, ५५४ हेक्टर हरभरा, १९२ हेक्टर कांदा तर ३ हजार ६४१ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान झाले. तर धरणगाव तालुक्यात १७९५ हेक्टर, मुक्ताईनगर ५१७, जामनेर ५१७, अमळनेर ३ हजार ५८९, बोदवड ८० आणि यावल तालुक्यात ७०.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा- विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळेल शिक्षण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचा उपक्रम!

जळगावात अवकाळी पावसाने केले केळीसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान, ३० हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.