ETV Bharat / state

जळगावात चॉपर घेवून फिरणाऱ्या तरुणास अटक; दोघांवर गुन्हा - जळगावातून दोन तरुणांना अटक

जळगाव - शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Illegal weapons
तरुणास अटक
author img

By

Published : Nov 22, 2020, 5:20 PM IST

जळगाव - शहरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पवन नारायण कापसे (वय २५) व परेश आनंदा गोयर (वय २६, दोघे रा. वैष्णवी पार्क) अशी शहरातील मातोश्री शाळेजवळून अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, शहरातील वैष्णवी पार्ककडे जाणाऱ्या रोडवरील मातोश्री शाळेजवळ एका तरुणाच्या हातात चॉपर असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास मातोश्री शाळेजवळून संशयित आरोपी पवन नारायण कापसे याला मातोश्री शाळेजवळ अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याने हा चॉपर मित्र परेश आनंदा गोयर याच्याकडून घेतला असल्याचे सांगितले. तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.