ETV Bharat / state

दुहेरी हत्याकांड : अनैतिक संबंधातूनच घडले केऱ्हाळा खुर्दचे खून प्रकरण

रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर तातडीने तपासचक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली असून घटनेचे मूळ कारण समोर आणले आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेतील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी लक्ष्मण किसन निकम, कैलास गुना गाढे
author img

By

Published : Nov 20, 2019, 5:40 PM IST

जळगाव - रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर तातडीने तपासचक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेतील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

केऱ्हाळा खुर्दच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा

हेही वाचा - आसाममध्ये भीषण अपघात; आठ जण जागीच ठार!

कैलास गुना गाढे (वय 57, रा. केऱ्हाळा बुद्रुक, ता. रावेर) आणि लक्ष्मण किसन निकम (वय 60, रा. केऱ्हाळा खुर्द, ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. कैलास व लक्ष्मण यांनी 19 नोव्हेंबरला केऱ्हाळा खुर्द येथील संबंध असलेल्या महिलांची धारधार हत्याराने निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाच्या मागे अनैतिक संबंधाचे मूळ कारण असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

या हत्याकांडातील आरोपी कैलास गाढे याचे एका महिलेशी तर लक्ष्मण निकम याचे दुसऱ्या महिलेशी गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, दोघीही आपल्याशी एकनिष्ठ नसल्याच्या संशयावरून त्यांची हत्या केल्याचे आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हत्येपूर्वी शारीरिक संबंध -

आरोपी कैलास गाढे याने सर्वात आधी एका महिलेची हत्या केल्यानंतर ही बाब दुसरी महिला गावात वाच्यता करेल, या भीतीने त्याने नंतर तिची पण हत्या केली. यात दुसरा आरोपी लक्ष्मण निकम याने त्याला मदत केली. या घटनेत हत्या झालेल्या महिला 18 नोव्हेंबर रोजी गुरांसाठी चारा घेण्यासाठी जंगलात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. परंतु, त्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत आल्या नव्हत्या. त्यामुळे पीडितेच्या मुलाने पोलिसात तशी नोंद केली होती. तेथूनच पोलीस तपासाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 रोजी दुपारी दोघींचे मृतदेह कापसाच्या शेतात आढळले होते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात त्यांच्या अनैतिक संबंधाची माहिती समोर आली होती. घटनेनंतर कैलास व लक्ष्मण हे दोघेही फरार असल्याने पोलिसांचा संशय बळावला. नंतर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

हेही वाचा - धक्कादायक ! राज्यभरात 10 महिन्यात 2 हजार 225 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; नेतेमंडळी सरकारस्थापनेत व्यस्त

Intro:जळगाव
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांना यश आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर तातडीने तपासचक्रे फिरवत पोलिसांनी अवघ्या 12 तासाच्या आत दोन आरोपींना अटक केली असून घटनेचे मूळ कारण समोर आणले आहे. या हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अटकेतील दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.Body:कैलास गुना गाढे (वय 57, रा. केऱ्हाळा बुद्रुक, ता. रावेर) आणि लक्ष्मण किसन निकम (वय 60, रा. केऱ्हाळा खुर्द, ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी नावे आहेत. कैलास व लक्ष्मण यांनी 19 नोव्हेंबर रोजी केऱ्हाळा खुर्द येथीलच शालूबाई गौतम तायडे व नसिबा रुबाब तडवी या दोघी महिलांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या केली होती. या हत्याकांडाच्या मागे अनैतिक संबंधाचे मूळ कारण असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या हत्याकांडातील आरोपी कैलास गाढे याचे मृत नसिबा तडवी हिच्याशी तर लक्ष्मण निकम याचे शालूबाई तायडे हिच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. मात्र, दोघीही आपल्याशी एकनिष्ठ नसल्याच्या संशयावरून त्यांची हत्या केल्याचे आरोपींनी आपल्या कबुली जबाबात म्हटले आहे.

हत्येपूर्वी शारीरिक संबंध-

शालूबाई व नसिबा यांची हत्या करण्यापूर्वी दोन्ही आरोपींनी त्यांच्याशी एका कापसाच्या शेतात शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. आरोपी कैलास गाढे याने सर्वात आधी नसिबा तडवीची हत्या केली. त्यानंतर ही बाब शालूबाई गावात सांगेल, या भीतीने त्याने नंतर शालुबाईची देखील हत्या केली. यात दुसरा आरोपी लक्ष्मण निकम याने त्याला मदत केली.Conclusion:दोघींनी चोरला होता कापूस-

या घटनेत हत्या झालेल्या शालूबाई व नसिबा यांनी दुसऱ्या व्यक्तीच्या शेतातून कापूस चोरला होता. 18 रोजी त्या गुरांसाठी चारा घेण्यासाठी जंगलात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. परंतु, त्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परत आल्या नव्हत्या. त्यामुळे शालूबाईच्या मुलाने पोलिसात तशी नोंद केली होती. तेथूनच पोलीस तपासाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 रोजी दुपारी दोघींचे मृतदेह कापसाच्या शेतात आढळले होते. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात त्यांच्या अनैतिक संबंधाची माहिती समोर आली होती. घटनेनंतर कैलास व लक्ष्मण हे दोघेही फरार असल्याने पोलिसांचा संशय बळावला. नंतर गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.