ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील नद्यांमधून ५ हजार ९२७ दलघमी पाणी गेले वाहून!

जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर हे मोठे, तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय ९६ लघुप्रकल्प आहेत. आतापर्यंत तापी व गिरणा नदीतून बाहेरच्या जिल्ह्यात तब्बल ५ हजार ९२७ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वाहून गेले. हे पाणी योग्य पद्धतीने अडविले गेले, तर जिल्ह्यात पाण्याच्या बाबतीत आबादानी पाहायला मिळू शकते.

The thousand liter of water is waste From the rivers of Jalgaon
जळगाव जिल्ह्यातील नद्यांमधून ५ हजार ९२७ दलघमी पाणी गेले वाहून!
author img

By

Published : Oct 11, 2020, 5:37 PM IST

Updated : Oct 11, 2020, 6:01 PM IST

जळगाव - यंदाच्या पावसाळ्यात गिरणा व तापी नदीतून तीन महिन्यांत तब्बल ५ हजार ९२७ दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा विसर्ग झाला. एवढ्या पाण्यात जळगाव जिल्ह्यातील ३ मोठे, १३ मध्यम व ९६ लघुप्रकल्प तब्बल चारवेळा भरले असते. मात्र, एवढे पाणी सर्वांच्या डोळ्यादेखत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचे पाणी केव्हा अडवणार आहोत, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील नद्यांमधून ५ हजार ९२७ दलघमी पाणी गेले वाहून!

जळगाव जिल्ह्यातून तापी व गिरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात. गिरणा नदीवर नाशिक जिल्ह्यात गिरणा धरण आहे, तर तापीवर हतनूर प्रकल्प आहे. ते भरल्यावर पाणी पुढे कुठेच अडविण्याची सोय नसल्याने ओव्हरफ्लो होणारे पाणी दरवर्षी वाया जाते. मात्र, या वाया जाणाऱ्या पाण्याचे कुणालाच काही सोयरेसुतक नाही, ही वस्तुस्थिती आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची साठवण क्षमता एक हजार ४२७ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५०.४० टीएमसी इतकी आहे. गिरणा धरणाची साठवण क्षमता ६०८ दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, यंदा पावसाळ्यात गिरणा धरणातून आतापर्यंत ९६५ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला, तर हतनूर धरणातून ४ हजार ९६२ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वाहून गेल्याचे आकडेवारी सांगते.

तापी नदीवर हतनूर प्रकल्पानंतर कुठेही अद्याप पाणी अडविण्याची व्यवस्था नाही. शेळगाव व पाडळसे प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून अपूर्णावस्थेत आहे. अर्थात, आता शेळगाव बॅरेजचे काम मार्गी लागू शकते. मात्र, पाडळसे प्रकल्प अजूनही निधीकडे डोळे लावून बसला आहे. तर गिरणा नदीवर धरणानंतर कुठेही पाणी अडविले जात नाही. वरखेडे येथील प्रकल्पाला चालना मिळाली आहे. तर सात बलून बंधाऱ्यांना निधीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सध्या तरी गिरणा धरणाचा ओव्हरफ्लो हा वाया जात आहे. त्यामुळे यंदा एक वेळ गिरणा भरेल, इतके पाणी तीन महिन्यांत वाहून गेल्याचे पाहावयास मिळाले. पाणी अडविण्यासाठीची फाटकी झोळी केव्हा शिवली जाईल, असा प्रश्‍न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

एकीकडे दुष्काळाचे चटके सहन करायचे अन् दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असेल, तर ते परवडणारे नाही. सर्वच पाणी अडविणे शक्य नसले तरी त्यातील ३०-४० टक्के पाणी अडविले, तरी जिल्हा टँकरमुक्त होऊ शकतो. शिवाय जिल्हा सिंचनाने सुजलाम् सुफलाम् होऊ शकेल. अर्थात, यासाठी लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती आणि यासाठी शासनाकडे रेट्याची आवश्यकता आहे.

जळगाव जिल्ह्यात गिरणा, हतनूर व वाघूर हे मोठे, तर १३ मध्यम प्रकल्प आहेत. याशिवाय, ९६ लघुप्रकल्प आहेत. या सर्वांची एकूण साठवण क्षमताही १ हजार ४२७ दशलक्ष घनमीटरएवढी आहे. आतापर्यंत तापी व गिरणा नदीतून बाहेरच्या जिल्ह्यात तब्बल ५ हजार ९२७ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वाहून गेले. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रकल्प किमान चार वेळा भरले असते, एवढे पाणी जिल्ह्याच्या सीमेतून दुसऱ्या जिल्ह्यात वाहून गेल्याचे पाण्याची आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. योग्य पद्धतीने हे वाया जाणारे पाणी अडविले गेले, तर जिल्ह्यात पाण्याच्या बाबतीत आबादानी पाहायला मिळणार आहे.

Last Updated : Oct 11, 2020, 6:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.