ETV Bharat / state

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य; कार्यकर्त्यांनी शांत राहण्याचे खडसेंचे आवाहन

कोणत्याही पवारांशी माझा संपर्क झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात तर नाहीच नाही. लोकसभेवेळी झाला असेल, असेही खडसेंनी यावेळी स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 3, 2019, 4:34 PM IST

Updated : Oct 3, 2019, 6:26 PM IST

जळगाव - भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या यादीत डावलल्याने कमालीचे नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाराजी नाट्याच्या तिसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहील, अशी भूमिका घेत त्यांनी संतापलेल्या समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - भाजपचा एकनाथ खडसेंना ठेंगा, मात्र मुलगी रोहिणी खडसेला मिळणार उमेदवारी..?

या सार्व घडामोडींमुळे निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून एकनाथ खडसे थेट कार्यकर्त्यांच्या गराड्यात येऊन बसले. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहील. कारण, पक्ष आहे म्हणून आपण आहोत. तसेच आपल्यामुळे पक्ष आहे. ही बाब लक्षात घेऊन पक्षाच्या शिस्तीला बाधा पोहचेल, असे कृत्य करू नका. या काळात खूप अफवा पसरत आहेत. पण, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील खडसेंनी कार्यकर्त्यांना केले.

हेही वाचा -मिळेल त्याला गळाला लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- गिरीश महाजन

माझा कोणत्याही पवारांशी संपर्क नाही-

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किंवा अजित पवार अशा कोणताही पवारांशी माझा संपर्क झालेला नाही. गेल्या तीन वर्षात मी पवारांच्या संपर्कात नाही. गेल्या विधानसभेवेळी माझा त्यांच्याशी झाला असेल, असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे. खडसेंच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांचा शरद पवारांशी संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पक्ष सोडणार नसल्याचे संकेत-

खडसेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ते पक्ष सोडणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खडसेंना पक्षाने तिकीट दिले तरीही ते समाधानी असल्याचे संकेतही त्यांनी 'पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल', या विधानावरून दिले आहे. दरम्यान, खडसे आता काय भूमिका जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा-

खडसे कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी बंगल्यातून बाहेर आल्यानंतर एका निष्ठावान कार्यकर्त्याने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्या कार्यकर्त्याने पक्षाने तुम्हाला तिकीट दिले नाही तर आम्ही आत्मदहन करू, असा इशारा दिला. मात्र, खडसेंनी संबंधित कार्यकर्त्याची समजूत काढली. 'आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहोत. असे चुकीचे पाऊल आपण कसे उचलू शकतो', असेही खडसे म्हणाले.

Intro:Body:

[10/3, 3:19 PM] Prashant Bhadane, Jalgaon: Jalgaon

-एकनाथ खडसेंचा कार्यकर्त्यांशी साधला संवाद.

-शांत राहण्याचे केले आवाहन. 

-पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य राहणार असल्याची दिली प्रतिक्रिया.

[10/3, 3:19 PM] Prashant Bhadane, Jalgaon: एकनाथ खडसे

अफवांवर विश्वास ठेवू नका, संयम बाळगा असे आवाहन देखील खडसेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.

[10/3, 3:21 PM] Prashant Bhadane, Jalgaon: एकनाथ खडसे

पक्षाची बदनामी किंवा हानी होईल, असर कृत्य करू नका. पक्षामुळे आपण आहोत, आपल्यामुळे पक्ष आहे. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. कोणताही पवारांशी माझा संपर्क झालेला नाही. गेल्या तीन महिन्यात तर नाहीच नाही. लोकसभेवेळी झाला असेल, असेही खडसेंनी स्पष्ट केले आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 6:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.