जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील 48 वर्षीय शेतमजुर सुंंदरलाल सुकदेव गढरी हे उन्हात बकऱ्या चारण्यासाठी गेले तेव्हा त्यांना अचानक चक्कर आली त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता. जळगाव जिल्ह्यात काही दिवसापुर्वी उष्माघाताने मृत्यू झाला होता. गढरी हे सकाळी नेहमीप्रमाणे बकऱ्या चारण्यासाठी गेले दुपारी दोनच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आल्याने ते घरी आले. त्यांना डॉक्टरकडे नेले असतांनाच त्याचा मृत्यु झाला.
खाजगी डॉक्टराने त्यांना तपासले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन झाले. मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र उष्माघातामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची शंका शेतमजूर गढरी यांच्या मुलाने व्यक्त केली आहे. गढरी यांची घरची परिस्थिती बेताची आहे. मोलमजुरी करून तसेच बकऱ्या चारून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होेते. त्यांना कुठलाही आजार नव्हता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे.