ETV Bharat / state

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. ७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
author img

By

Published : Aug 1, 2019, 9:02 AM IST

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. ७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.

विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्याचा पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश अनिवार्य असून २० ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यार्थ्याचा या अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असावा. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ते विद्यार्थी परिषद निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत आचारसंहितेचा कालावधी राहणार आहे.

विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम असा-

२३ ऑगस्ट रोजी महाविद्यालय, परिसंस्था, शैक्षणिक विभाग यांच्याकडून निवडणुकीची अधिसूचना व विहित नमुने प्रसिद्ध केले जातील. २४ ऑगस्टला मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी विद्यापीठाच्या अधिसभागृहात आरक्षण सोडत होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी संबंधित महाविद्यालयांमध्ये संकेतस्थळ व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. २६ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदविता येतील. २७ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमधील सक्षम प्राधिकरणाने आक्षेपाबाबत निर्णय देऊन निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी होईल व सायंकाळी ५ वाजता वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल.

३ सप्टेंबरला सकाळी ११ ते ५ या वेळेत अर्ज वैधतेबाबत आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या आक्षेपांची सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल. सायंकाळी ५ वाजता अंतिम नामनिर्देशन अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. ५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देश अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ७ सप्टेंबरला मतदान होणार असून प्राचार्यांनी महाविद्यालयांचे वेळापत्रक लक्षात घेऊन सलग ४ तास मतदानासाठी ठरवायाचे आहेत. त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निकाल घोषित झाल्यानंतर निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनिधी आणि एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक उपक्रम या मधील प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे. ९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशेब विहित नमुन्यात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा.
jalgao
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम असा-

९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. सायंकाळी ४ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध होईल. ११ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार यादीवर आक्षेप प्राचार्यांकडे नोंदवता येतील. त्याच दिवशी ४ वाजता प्राचार्यांनी आलेले लेखी आक्षेप विद्यापीठ निवडणूक कक्षाकडे ई-मेलद्वारे पाठवावेत. १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आक्षेपांवर सक्षम प्राधिकरण निर्णय देतील. सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. १३ व १४ सप्टेंबरला सकाळी ११ ते ४:३० या वेळेत विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत नामनिर्देश अर्ज दाखल करता येतील. १५ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल व सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ संकेतस्थळ व सूचना फलकावर वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येतील.

प्राप्त आक्षेपांवर १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता निर्णय दिला जाईल व सायंकाळी ५ वाजता वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. १८ व १९ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरला सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. २३ सप्टेंबरला महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभाग येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होईल व निकाल जाहिर केला जाईल. २८ सप्टेंबरला एनएसएस, क्रीडा, एनससीसी, सांस्कृतिक उपक्रम यातून सदस्यांचे नामनिर्देशन होणार आहे. २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशोब सकाळी ११ ते दुपारी साडेचार या वेळेत सादर करणे आवश्यक आहे.

Intro:जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. ७ सप्टेंबर २०१९ रोजी जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालये, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होणार आहे.Body:विद्यार्थी परिषद निवडणुकीसाठी २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्याचा पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश अनिवार्य असून २० ऑगस्ट २०१९ पर्यंत विद्यार्थ्याचा या अभ्यासक्रमाला प्रवेश झालेला असावा. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून ते विद्यार्थी परिषद निवडणूक निकाल घोषित होईपर्यंत आचारसंहितेचा कालावधी राहणार आहे.Conclusion:विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम असा-

२३ ऑगस्ट रोजी महाविद्यालय, परिसंस्था, शैक्षणिक विभाग यांच्याकडून निवडणुकीची अधिसूचना व विहित नमुने प्रसिद्ध केले जातील. २४ ऑगस्टला मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी विद्यापीठाच्या अधिसभागृहात आरक्षण सोडत होईल. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर तुकडीनिहाय तात्पुरती मतदार यादी संबंधित महाविद्यालयांमध्ये संकेतस्थळ व सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाईल. २६ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदविता येतील. २७ ऑगस्टला सांयकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयांमधील सक्षम प्राधिकरणाने आक्षेपाबाबत निर्णय देऊन निवडणूक अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील. २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत संबंधित महाविद्यालयांमध्ये नामनिर्देशन अर्ज दाखल केले जातील. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्राप्त नामनिर्देशन अर्जांची छाननी होईल व सायंकाळी ५ वाजता वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. ३ सप्टेंबरला सकाळी ११ ते ५ या वेळेत अर्ज वैधतेबाबत आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. ४ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता या आक्षेपांची सुनावणी घेऊन निर्णय दिला जाईल. सायंकाळी ५ वाजता अंतिम नामनिर्देशन अर्जाची यादी प्रसिद्ध होईल. ५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देश अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ७ सप्टेंबरला मतदान होणार असून प्राचार्यांनी महाविद्यालयांचे वेळापत्रक लक्षात घेऊन सलग ४ तास मतदानासाठी ठरवायाचे आहेत. त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील. निकाल घोषित झाल्यानंतर निवडून आलेल्या अध्यक्ष, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनिधी आणि एनएसएस, क्रीडा, एनसीसी, सांस्कृतिक उपक्रम या मधील प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेल्या सदस्यांची माहिती विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे. ९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशेब विहित नमुन्यात संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा.

विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकीचा कार्यक्रम असा-

९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. सायंकाळी ४ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची तात्पुरती मतदार यादी प्रसिद्ध होईल. ११ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मतदार यादीवर आक्षेप प्राचार्यांकडे नोंदवता येतील. त्याच दिवशी ४ वाजता प्राचार्यांनी आलेले लेखी आक्षेप विद्यापीठ निवडणूक कक्षाकडे ई-मेलद्वारे पाठवावेत. १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आक्षेपांवर सक्षम प्राधिकरण निर्णय देतील. सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ विद्यार्थी संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. १३ व १४ सप्टेंबर सकाळी ११ ते ४:३० या वेळेत विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत नामनिर्देश अर्ज दाखल करता येतील. १५ सप्टेंबरला अर्जांची छाननी होईल व सायंकाळी ५ वाजता विद्यापीठ संकेतस्थळ व सूचना फलकावर वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येतील. प्राप्त आक्षेपांवर १७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता निर्णय दिला जाईल व सायंकाळी ५ वाजता वैध, अवैध अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. १८ व १९ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नामनिर्देशन अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरला सांयकाळी ५ वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. २३ सप्टेंबरला महाविद्यालय, परिसंस्था, विद्यापीठ शैक्षणिक विभाग येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मतदान होणार आहे. २७ सप्टेंबरला सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होईल व निकाल जाहिर केला जाईल. २८ सप्टेंबरला एनएसएस, क्रीडा, एनससीसी, सांस्कृतिक उपक्रम यातून सदस्यांचे नामनिर्देशन होणार आहे. २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक उमेदवाराने खर्चाचा हिशोब सकाळी ११ ते दुपारी साडेचार या वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.