ETV Bharat / state

भुसावळ जंक्शनवरून श्रमिक एक्स्प्रेस गोरखपूरला रवाना; 748 परप्रांतीयांना दिलासा - social distancing

उर्वरित प्रवाशांसाठी लवकरच दुसरी रेल्वे गाडी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशनवरून गाडी निघताना प्रवाशांनी 'भारत माता की जय'चा जयघोष केला. या प्रवाशांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भुसावळ जंक्शनवरून गोरखपूरसाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस

author img

By

Published : May 16, 2020, 2:43 PM IST

जळगाव - लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना दिलासा देत भुसावळ जंक्शनवरून पुन्हा 748 प्रवाशांना घेऊन (01850) श्रमिक एक्स्प्रेस गोरखपूरसाठी रवाना झाली. शुक्रवारी सायंकाळी 6.45 वाजता गोरखपूरकडे गाडी रवाना झाली. सुमारे दीड महिन्यांपासून भुसावळसह जळगाव, धुळे तसेच बुलडाणा भागात अडकलेल्या परप्रांतीय प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळाला.

भुसावळ जंक्शनवरून गोरखपूरसाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस
भुसावळ जंक्शनवरून गोरखपूरसाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस
भुसावळ जंक्शनवरून गोरखपूरसाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस
भुसावळ जंक्शनवरून गोरखपूरसाठी धावली श्रमिक एक्स्प्रेस

याआधी 6 मे रोजी प्रथमच भुसावळ रेल्वे स्थानकावरून लखनऊसाठी गाडी सोडण्यात आली होती. तर, 15 मे रोजी पुन्हा परप्रांतीय प्रवाशांना गोरखपूर जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आली. तत्पूर्वी बुलडाणा, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातून परप्रांतीय मजुरांना विविध आगाराच्या एसटी बसेसव्दारे भुसावळात आणण्यात आले होते. त्यांना रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करून रेल्वे स्थानकात आणण्यात आले. जळगावचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी किरण सावंत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्यासह संबंधित प्रांताधिकारी यांच्या नियोजनानुसार जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून आलेल्या सर्व परप्रांतीयांची हजेरी घेण्यात आली. तर, प्रवाशांना प्रवासाची तिकीटे शासनाकडून काढून देण्यात आली.

उर्वरित प्रवाशांसाठी लवकरच दुसरी रेल्वे गाडी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सांगितले. रेल्वे स्टेशनवरून गाडी निघताना प्रवाशांनी 'भारत माता की जय'चा जयघोष केला. या प्रवाशांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यांनी राखला चोख बंदोबस्त -

स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त क्षितीज गुरव, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, भुसावळ शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार, जीआरपी निरीक्षक दिनकर डंबाळे, आरपीएफ निरीक्षक दिनेश नायर आदींनी बंदोबस्त चोख ठेवला होता. दरम्यान, यावेळी स्टेशन संचालक जी. आर. अय्यर, रेल्वे अधिकारी व कर्मचारी आदींचीही उपस्थिती होती. महसूल, रेल्वे व पोलीस दलाचे अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.