जळगाव - शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मोफत बस प्रवासाची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केली. या घोषणेचे पालकवर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयाचा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना थेट लाभ होणार असून, शिक्षणासाठी विद्यार्थिनी शहरात जाऊ शकतील. हा निर्णय खूपच चांगला आहे, अशा शब्दांत काही पालकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना तसेच विद्यार्थिनींना खास भेट देणाऱ्या अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या. शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत बस प्रवासाची महत्त्वाकांक्षी घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या घोषणेचे पालकवर्गाकडून विशेष स्वागत करण्यात येत आहे. ज्या विद्यार्थिनी आर्थिक अडचणींमुळे शहरात जाऊन शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. त्यांना आता मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे. शहरातील शाळा, महाविद्यालयांची दारे थेट ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी खुली झाली आहेत.
हेही वाचा - चाळीसगावात मुरूमाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली; दोन मजुरांचा दबून मृत्यू
ग्रामीण भागात विशेष बसफेऱ्या असाव्यात
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने विशेष योजना आणली आहे. या सोबतच दीड हजार सीएनजी आणि हायब्रीड बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात झालेल्या या घोषणेचे पालकवर्गाकडून स्वागत केले जात आहे. राज्य सरकारचा हा निर्णय चांगला आहे. आता या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. याशिवाय ग्रामीण भागात मर्यादित बसफेऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष बस फेऱ्या सोडल्या जाव्यात, अशी अपेक्षाही काही पालकांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - सातपुडा पर्वत धुमसतोय; निसर्गसंपदेसह वन्यजीवांची मोठ्या प्रमाणावर हानी
हेही वाचा - बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर न्यायालयात शरण