ETV Bharat / state

कोरोना; जळगावात 10 संशयितांपैकी चौघांचे अहवाल निगेटिव्ह - जिल्हाधिकारी

कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयावरून 18 मार्चला 4 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. आता रुग्णालयात एकूण 5 संशयित दाखल आहेत.

author img

By

Published : Mar 19, 2020, 6:14 PM IST

jalgaon corona
डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी

जळगाव - जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या विशेष कक्षात आतापर्यंत 10 संशयितांची तपासणी होऊन त्यांचे नमुने घेतले होते. त्यात चौघांचे नमुने निगेटिव्ह आले असून इतरांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत.

डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी

कोरोना विषाणू संसर्गाच्या संशयावरून 18 मार्चला 4 रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. आता रुग्णालयात एकूण 5 संशयित दाखल आहेत. यात एका वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. जिल्ह्यात 15 मार्चला पहिला संशयित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाला होता. यानंतर आतापर्यंत परराज्य, परदेशातून आलेल्या 9 जणांनी आपली तपासणी करून घेतली आहे. यात केरळ येथून आलेले 2, मुंबई येथून आलेली 1 तरुणी आणि आणखी 1 अशा 4 संशयितांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 5 संशयितांच्या तपासणीचा अहवाल आलेला नाही. त्यात बुधवारी ऑस्ट्रेलिया येथून आलेला 28 वर्षीय तरुण, कॅनडा येथून अमळनेरला आलेला 28 वर्षीय तरुण, दुबई येथून आलेली 18 वर्षीय तरुणी व पुणे येथून आलेल्या एका वर्षाच्या बालकाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसला तरी नागरिकांनी खबरदारी घेतली पाहिजे. कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. जनजागृतीदेखील सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.