ETV Bharat / state

राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; भुजबळांबद्दल अपशब्द वापरल्याने संतप्त

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरत त्यांना धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले.

author img

By

Published : May 6, 2021, 7:50 PM IST

जामनेरात राष्ट्रवादीकडून भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या पुतळ्याचे दहन; भुजबळांबद्दल अपशब्द वापरल्याने संतप्त
ncp agitation against chandrakant patil in jamner

जळगाव - भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरत त्यांना धमकी दिली होती. या घटनेचे आता सर्वत्र संतप्त पडसाद उमटत आहेत. जामनेरमध्ये गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करत, जोरदार घोषणाबाजी केली.

जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील नगरपालिका चौकात हे आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय गरूड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

हेही वाचा - बंगालमधील हिंसाचाराविरोधात कांदिवलीत भाजपचे धरणे आंदोलन

काय आहे प्रकरण?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी अपशब्द वापरत त्यांना धमकी दिली होती. चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याचे राज्यभर संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

चंद्रकांत पाटिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी-

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मंत्री छगन भुजबळ यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिल्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील आंदोलकांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.