जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असून, गुरुवारी (दि. 25) दिवसभरात 279 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे, पुन्हा 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 59 हजार 864 इतकी झाली आहे.
गुरुवारी आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरातीलच आहेत. जळगावात पुन्हा सर्वाधिक 122 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्या खालोखाल चाळीसगाव तालुक्यात 45, चोपडा तालुक्यात 33, मुक्ताईनगरात 20 तर जामनेरात 18 रुग्ण आढळले. तर तालुक्यात देखील एकेरी आकडी संख्येने रुग्ण समोर आले आहेत.
138 रुग्णांची कोरोनावर मात
गुरुवारी घडलेली दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 554 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
अशी आहे आकडेवारी
जळगाव जिल्ह्यात आता सद्यस्थितीत कोरोनाचे 1 हजार 929 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1 हजार 415 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत तर 512 रुग्णांना लक्षणे आहेत. सक्रिय रुग्णांपैकी 1 हजार 295 रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. तर 243 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 120 रुग्ण हे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
हेही वाचा - जळगावात राष्ट्रवादीची गांधीगीरी; मनपा अधिकाऱ्यांना घातला भाजपचा गमछा