ETV Bharat / state

ममुराबाद शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत; हत्या केल्याचा वन्यप्रेमींना संशय

ममुराबाद गावाच्या शिवारात एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनाम्याचे काम सुरू आहे.

author img

By

Published : Jan 6, 2021, 12:40 PM IST

leopard found dead near mamurabad in jalgaon district
ममुराबाद शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत; हत्या केल्याचा वन्यप्रेमींना संशय

जळगाव - शहरापासून जवळच असलेल्या ममुराबाद गावाच्या शिवारात एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास उजेडात आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनाम्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या बिबट्याचा मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या बिबट्याची हत्या केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी बघ्यांची उसळलेली गर्दी

ममुराबाद गावापासून काही अंतरावर नांद्रा फाटा आहे. याठिकाणी रस्त्याच्या कडेलाच हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाणाऱ्या काही शेतमजुरांना हा बिबट्या निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे ते भीतीने पळून गेले. या घटनेची माहिती ममुराबाद गावात पसरली. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी केलेल्या पाहणीत हा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले.

घटनास्थळी बघ्यांची उसळली गर्दी-
बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे पंचनामा करताना अडचणी येत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काही तरुण याठिकाणी हुल्लडबाजी करत होते.

बिबट्यावर विषप्रयोग केल्याचा संशय-
दरम्यान, या बिबट्यावर विषप्रयोग करून त्याला ठार केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला याठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण ममुराबाद शिवारात आजपर्यंत बिबट्या आढळून आल्याची एकही घटना घडलेली नाही. अशा परिस्थितीत थेट बिबट्या मृतावस्थेत आढळून येणे संशयास्पद असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे, अशीही मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार-
बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शवविच्छेदनासाठी नियमानुसार सर्व प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - जळगावात 'शुट आऊट'चा प्लॅन फसला, पिस्तूल, काडतुसासह दोघांना अटक

हेही वाचा - 'राजकीय दबावापोटी गिरीश महाजनांवर उशिराने गुन्हा दाखल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.