जळगाव : मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री कन्नड घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. घाटात असलेल्या अनेक वाहनांवर थेट दरड कोसळल्याने वाहने अडकून पडली आहेत. काही वाहनांचे नुकसान देखील झाले आहे. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. पाऊस सुरूच असल्याने, तसेच अवघड घाटामुळे मदत कामात अडचणी येत आहेत. या मार्गाने प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Video: मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली, अनेक वाहने अडकली - जळगाव लेटेस्ट न्यूज
कन्नड घाटात ठिकठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. घाटात असलेल्या अनेक वाहनांवर थेट दरड कोसळल्याने वाहने अडकून पडली आहेत.
![Video: मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळली, अनेक वाहने अडकली Jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12925074-390-12925074-1630384607494.jpg?imwidth=3840)