ETV Bharat / state

जळगावातील शिवसैनिक आक्रमक, निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

author img

By

Published : Nov 7, 2021, 4:57 PM IST

भाजप नेते निलेश राणे यांच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध शिवराळ भाषेत आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जळगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

शिवसैनिक
शिवसैनिक

जळगाव - भाजप नेते निलेश राणे यांच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध शिवराळ भाषेत आक्षेपार्ह ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जळगाव शहर पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.

जळगावातील शिवसैनिक आक्रमक

काय आहे प्रकरण..?

मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. कव्वाली गायन केल्याच्या याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर शिवराळ भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना शिवसेनेवरही जोरदार टीकास्त्र डागले. 'असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे', अशा शब्दांत राणेंनी शिवसेनेवर टीका केली. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका ट्विटमध्ये राणेंनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंबद्दलही शिवराळ भाषेचा वापर करत आक्षेपार्ह उल्लेख केला आहे. या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राणे बंधूंवर गुन्हा दाखल करावा, त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करावे

या विषयाबाबत माध्यमांसमोर भूमिका मांडताना जळगाव जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, भाजप नेते नारायण राणे तसेच त्यांची दोन्ही मुले निलेश व नितेश राणे हे नेहमी शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. निलेश व नितेश राणे हे देखील शिवसेना पक्ष तसेच शिवसेना नेत्यांविषयी कायमच आक्षेपार्ह वक्तव्य करत असतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. आताच त्यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी शिवराळ भाषेत ट्विट केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी आहे. त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करावेत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. राणेंवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडू, असा इशारा विष्णू भंगाळे यांनी दिला.

शहर पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे व गुलाबराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या आशयाचे निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांना दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली.

हे ही वाचा - गुलाबराव पाटलांवर निलेश राणेंची शिवराळ भाषेतून टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.