ETV Bharat / state

जळगाव महापालिकेची २७ गाळेधारकांवर कारवाई; करारनामा संपल्यावर थकबाकी न भरल्याने उपसले हत्यार - jalgaon MNC latest news

महापालिका मालकीच्या फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या 950 गाळेधारकांना ८१ 'क'च्या नोटिसा बजावून ११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. त्यातील काही गाळेधारकांनी रक्कमा भरल्या होत्या. मात्र, वारंवार नोटिसा देवून देखील काही गाळेधारकांनी एकही रुपयाचा भरणा केलेला नव्हता. थकबाकी असलेल्या गाळेधारकांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पुन्हा गाळे सील कारवाईचे हत्यार उपसले आहे.

जळगाव महापालिकेची २७ गाळेधारकांवर कारवाई
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:51 PM IST

जळगाव - महापालिकेच्या मालकीच्या महात्मा फुले मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे गाळ्यांचा भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. अनेकवेळा नोटिसा देवून देखील थकीत रकमेचा भरणा न केल्याचे महापालिका प्रशासनाने आज (गुरुवारी) सकाळपासून गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. दुपारी २ वाजेपर्यंत पथकाद्वारे पोलीस बंदोबस्तात २७ गाळे सील करण्यात आले. दरम्यान, कारवाई फक्त आमच्याच गाळ्यांवर का? असा प्रश्न उपस्थित करत काही गाळेधारकांनी कारवाई पथकातील अधिकाऱ्यांजवळ संताप व्यक्त केला.

महापालिका मालकीच्या फुले आणि सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या 950 गाळेधारकांना ८१ 'क'च्या नोटिसा बजावून ११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. त्यातील काही गाळेधारकांनी रक्कमा भरल्या होत्या. मात्र, वारंवार नोटिसा देवून देखील काही गाळेधारकांनी एकही रुपयाचा भरणा केलेला नव्हता. थकबाकी असलेल्या गाळेधारकांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पुन्हा गाळे सील कारवाईचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी सकाळपासूनच महात्मा फुले मार्केटमध्ये या कारवाईला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दोन पथकांच्या माध्यमातून गाळे सील कारवाईला सुरुवात झाली.

हेही वाचा - आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

यात प्रभाग अधिकारी विलास सोनवणे आणि अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या नेतृत्त्वात तसेच किरकोळ वसुली विभागाचे अधीक्षक नरेंद्र चौधरींच्या उपस्थितीत १४ आणि १३ गाळ्यांची यादी तयार करून सकाळी साडेअकरा वाजेपासून गाळे सील करण्यास सुरुवात झाली. यात शहर पोलीस ठाण्यासमोरील महात्मा फुले मार्केटमधील तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील गाळे मालासह सील करण्यात आले. यावेळी गाळेधारकांनी प्रशासनाच्या कारवाईला विरोध नसला तरी एवढे दुकाने असताना आमचीच दुकाने का सील करत आहेत?, पहिल्या क्रमांकाच्या गाळ्यापासून कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी दुकानांचा वीजपुरवठा बंद करून पंचनामा करून महापालिकेची कुलूपे लावून गाळे सील लावण्यात आले.

मार्केटमधील मोकळ्या जागेचा अनधिकृत वापर -

महात्मा फुले मार्केटच्या तळमजल्यावर बांधकाम करताना कॉलम टाकण्यात आले होते. त्यामुळे खालच्या आणि वरच्या मजल्याच्या दरम्यान जी मोकळी जागा झाली त्या जागेचा अनेक दुकानदारांनी विनापरवानगी वापर सुरू ठेवला आहे. बहुसंख्य दुकानांमध्ये भुयारी मार्ग तयार करून त्या जागेचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याचे कारवाई दरम्यान निदर्शनास आले. महात्मा फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावर अनेक दुकानदारांनी केलेला बेकायदेशीर अंतर्गत बदल देखील चौकशी दरम्यान उघडकीस आला.

हेही वाचा - मुदुलिगाडियाला मिळाला ओडिसामधील 'पहिले ईको व्हिलेज'चा मान

दुकान क्रमांक २८, २९ आणि ३० साठी एकच दरवाजा असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यावेळी सर्वच मार्गांना सील ठोकण्यात आले. काही दुकानदारांनी पैसे भरण्यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती केली. मात्र, महापालिकेच्या पथकांनी संधी न देता कारवाई केली. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरु होती. पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई दरम्यान गाळेधारकांचा संताप वगळता गोंधळ झाला नाही.

हेही वाचा - मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हीच गोड बातमी, संजय राऊतांनी भाजपला डिवचले

Intro:जळगाव
महापालिका मालकीच्या महात्मा फुले मार्केटमधील मुदत संपलेल्या गाळेधारकांकडे गाळ्यांचा भाड्याची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. अनेकवेळा नोटिसा देवून देखील थकीत रकमेचा भरणा न केल्याचे महापालिका प्रशासनाने आज सकाळपासून गाळे सील करण्याची कारवाई सुरू केली. सायंकाळपर्यंत दोन पथकाद्वारे पोलीस बंदोबस्तात २७ गाळे सील करण्यात आले. दरम्यान, कारवाई फक्त आमच्याच गाळ्यांवर का? असा प्रश्न उपस्थित करत काही गाळेधारकांनी कारवाई पथकातील अधिकाऱ्यांजवळ संताप व्यक्त केला.Body:महापालिका मालकीच्या फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील भाडे कराराची मुदत संपलेल्या  साडेनऊशे गाळेधारकांना ८१ 'क'च्या नोटिसा बजावून ११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची मुदत दिली होती. त्यातील काही गाळेधारकांनी रक्कमा भरल्या होत्या. मात्र, वारंवार नोटिसा देवून देखील काही गाळेधारकांनी एकही रुपयाचा भरणा केलेला नव्हता. थकबाकी असलेल्या गाळेधारकांविरुद्ध महापालिका प्रशासनाने पुन्हा गाळे सील कारवाईचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी सकाळपासूनच महात्मा फुले मार्केटमध्ये या कारवाईला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली. महापालिकेचे उपायुक्त डाॅ. उत्कर्ष गुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दोन पथकांच्या माध्यमातून गाळे सील कारवाईला सुरुवात झाली. यात प्रभाग अधिकारी विलास साेनवणी व अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्या नेतृत्त्वात तसेच किरकाेळ वसुली विभागाचे अधीक्षक नरेंद्र चाैधरींच्या उपस्थितीत १४ व १३ गाळ्यांची यादी तयार करून सकाळी साडेअकरा वाजेपासून गाळे सील करण्यास सुरुवात झाली. यात शहर पोलीस ठाण्यासमोरील महात्मा फुले मार्केटमधील तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावरील गाळे मालासह सील करण्यात आले. यावेळी गाळेधारकांनी प्रशासनाच्या कारवाईला विराेध नसला तरी एवढे दुकाने असताना अामचीच दुकाने का सील करताय. पहिल्या क्रमांकाच्या गाळ्यापासून कारवाई का करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी दुकानांचा वीजपुरवठा बंद करून पंचनामा करून महापालिकेची कुलूपे लावून गाळे सील लावण्यात आले.Conclusion:मार्केटमधील मोकळ्या जागेचा अनधिकृत वापर-

महात्मा फुले मार्केटच्या तळमजल्यावर बांधकाम करताना काॅलम टाकण्यात आले होते. त्यामुळे खालच्या व वरच्या मजल्याच्या दरम्यान जी मोकळी जागा झाली त्या जागेचा अनेक दुकानदारांनी विनापरवानगी वापर सुरू ठेवला आहे. बहुसंख्य दुकानांमध्ये भुयारी मार्ग तयार करून त्या जागेचा व्यवसायासाठी वापर करीत असल्याचे कारवाई दरम्यान निदर्शनास आले. महात्मा फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावर अनेक दुकानदारांनी केलेला बेकायदेशीर अंतर्गत बदल देखील चाैकशी दरम्यान उघडकीस आला. दुकान क्रमांक २८, २९ व ३० साठी एकच दरवाजा असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यावेळी सर्वच मार्गांना सील ठाेकण्यात आले. काही दुकानदारांनी पैसे भरण्यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती केली. परंतु महापालिकेच्या पथकांनी संधी न देता कारवाई केली. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरु होती. पोलीस बंदोबस्त असल्याने कारवाई दरम्यान गाळेधारकांचा संताप वगळता गोंधळ झाला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.