ETV Bharat / state

आदिशक्तीच्या जयघोषात दुमदुमली मुक्ताईनगरी; चांगदेव-मुक्ताबाई यात्रोत्सवातला सुरूवात - yatra

यात्रोत्सवात आलेल्या हजारो भाविकांनी एकादशीच्या मुहूर्तावर तापी-पूर्णा संगमावर पवित्र स्नान केले.

महाशिवरात्री यात्रोत्सव
author img

By

Published : Mar 3, 2019, 12:41 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे आद्य संतपीठ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे चांगदेव-मुक्ताबाई माघ वारी यात्रोत्सवाला हर्षोल्हासात प्रारंभ झाला आहे. माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या यात्रोत्सवात तीनशेहून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक दाखल झाले आहेत. आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात मुक्ताईनगरी दुमदुमली आहे.

यात्रोत्सवात आलेल्या हजारो भाविकांनी एकादशीच्या मुहूर्तावर तापी-पूर्णा संगमावर पवित्र स्नान केले. शनिवारी पहाटे ४ वाजता आदिशक्ती मुक्ताईच्या मूर्तीस संस्थानाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी ५ वाजता खासदार रक्षा खडसे, मानाचे वारकरी मधुकर नारखेडे यांनी मुक्ताईला सपत्नीक अभिषेक घालून आरती केली.

महाशिवरात्री यात्रोत्सव

महाशिवरात्रीला मुक्ताई निघतील चांगदेवांच्या भेटीला -

संत मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळी सकाळपासून दिंड्या नगर फेरीसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीला आदिशक्ती संत मुक्ताबाई आपले लाडके शिष्य योगी चांगदेव यांच्या भेटीसाठी निघतील. यावेळी वारकरी दिंड्यादेखील चांगदेव गावी जातील.

Intro:Body:

jalgaon mahashivratri yatra special

आदिशक्तीच्या जयघोषात दुमदुमली मुक्ताईनगरी; चांगदेव-मुक्ताबाई यात्रोत्सवातला सुरूवात

जळगाव - जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे आद्य संतपीठ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे चांगदेव-मुक्ताबाई माघ वारी यात्रोत्सवाला हर्षोल्हासात प्रारंभ झाला आहे. माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या यात्रोत्सवात तीनशेहून अधिक दिंड्यांसह लाखो भाविक दाखल झाले आहेत. आदिशक्ती मुक्ताईच्या जयघोषात मुक्ताईनगरी दुमदुमली आहे.

यात्रोत्सवात आलेल्या हजारो भाविकांनी एकादशीच्या मुहूर्तावर तापी-पूर्णा संगमावर पवित्र स्नान केले. शनिवारी पहाटे ४ वाजता आदिशक्ती मुक्ताईच्या मूर्तीस संस्थानाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांच्या हस्ते महाअभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी ५ वाजता खासदार रक्षा खडसे, मानाचे वारकरी मधुकर नारखेडे यांनी मुक्ताईला सपत्नीक अभिषेक घालून आरती केली.

महाशिवरात्रीला मुक्ताई निघतील चांगदेवांच्या भेटीला -

संत मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळी सकाळपासून दिंड्या नगर फेरीसाठी बाहेर पडल्या. त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाशिवरात्रीला आदिशक्ती संत मुक्ताबाई आपले लाडके शिष्य योगी चांगदेव यांच्या भेटीसाठी निघतील. यावेळी वारकरी दिंड्यादेखील चांगदेव गावी जातील.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.