जळगाव - चोपडा तालुक्यातील वाळकी येथे तरुणाने तब्बल पाच बिघे शेतात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ( Hemp Farm Jalgaon ) या तरुणाविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे ( Jalgaon SP Praveen Mundhe ) यांनी आज धाडसी कारवाई केली आहे. युट्युबवरील व्हिडिओ बघून तरुणाने अफूची शेती केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ( Hemp Farm by using youtube Jalgaon )
शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देविदास कुंनगर यांच्यासोबत मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी धडक दिली. संबंधित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपल्यावर प्रचंड कर्ज होते आणि त्यामुळे खूप त्रास होत होता. म्हणून आपण अफूच्या शेतीचा मार्ग अवलंबिले त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले.
युट्युब बघून घेतले अफूच्या शेतीचे धडे -
तालुक्यातील वाळकी येथे संशयित प्रकाश सुदाम पाटील या तरुणाकडे 5 बिघे शेती आहे. मात्र, सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर त्याने वेगळ्या मार्गाने पैसा कमविण्याचे ठरविले. कर्जबाजारीपणामुळे आपल्याला वेगळ्या मार्गाने पैसा कमवा लागेल, हे प्रकारच्या लक्षात आल्यानंतर त्याने युट्युब बघून अफूची शेती कशी करता येईल? पीक आल्यानंतर कशा पद्धतीने खसखसच्या स्वरुपात तिची विक्री करता येईल, याचे पूर्ण धडे युट्युब वरून घेतले.
हेही वाचा - Nagraj Manjule on Jhund : अमिताभ बच्चन यांच्यामुळे झुंड हिंदीत -नागराज मंजूळे
पोलिसांनी प्रकाशच्या मोबाईल जप्त केल्यानंतर त्यात अफूच्या शेतीची संबंधित काही व्हिडिओ आढळून आले आहेत. प्रकाशने साधारण डिसेंबर महिन्यात चार बिघे अफू पेरला होता. त्यामुळे अफूचे पीक आता पूर्णपणे तयार झाले होते. आणि पुढील पंधरा दिवसात त्या पिकाची कापणी करण्याचे प्रकाशचे नियोजन होते. मात्र, तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई केली. प्राथमिक चौकशीत प्रकाशने साधारण दीड ते दोन किलो अफू खसखसच्या स्वरूपात अमळनेर चोपडासह परिसरात विकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा संशयिताला पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे घटनास्थळी घेऊन गेले होते. तसेच दुसरीकडे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.