ETV Bharat / state

जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देऊ - गुलाबराव पाटील - News about Jalga Irrigation Project

पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर असणार आहे. यासाठी सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यासोबत घेण्यात येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले .

gulabrao-patil-said-the-emphasis-would-be-on-completing-irrigation-projects
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील
author img

By

Published : Jan 11, 2020, 8:50 PM IST

जळगाव - पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. सर्व सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात येईल. त्यानंतर सरकारकडे पाठपुरावा करून प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न असतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी शनिवारी सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पहिलीच पक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात पाडळसे येथील निम्न तापी सिंचन प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्पासह 7 बलून बंधारे प्रकल्प रखडलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? कोणत्या प्रकल्पाला किती निधीची आवश्यकता आहे? याशिवाय कोणत्या प्रकल्पाला काय अडचणी आहेत? ही माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पाणी योजनांची स्थितीही जाणून घेऊ -

राज्यातील पाणी योजनांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. अपूर्ण योजना त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी औरंगाबाद येथील सभेत दिले आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानासह सुमारे 800 कोटी रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनांवरील स्थगिती सरकारने उठवली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील किती आणि कोणत्या योजनांचा समावेश आहे, याची माहिती घेणार असल्याचे देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू -

आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील विविध नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सेनेने तयारी सुरू केली आहे. पक्षसंघटन मजबुतीसह त्या-त्या तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सेनेच्या आमदारांवर जबाबदारी निश्चिती केली जाणार आहे. प्रत्येक आमदाराला स्वतःच्या मतदारसंघासह जवळच्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठीच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतल्याचे पाटील म्हणाले.

Intro:जळगाव
पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर असणार आहे. सर्व सिंचन प्रकल्पांबाबत माहिती घेण्यासाठी लवकरच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात येईल. त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा करून प्रकल्प पूर्ण करण्यासंदर्भात प्रयत्न असतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.Body:जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आज (शनिवारी) सायंकाळी अजिंठा विश्रामगृहात जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पहिलीच पक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, जळगाव जिल्ह्यात पाडळसे येथील निम्न तापी सिंचन प्रकल्प, शेळगाव बॅरेज प्रकल्पासह 7 बलून बंधारे प्रकल्प रखडलेले आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले तर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे? कोणत्या प्रकल्पाला किती निधीची आवश्यकता आहे? याशिवाय कोणत्या प्रकल्पाला काय अडचणी आहेत? ही माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

पाणी योजनांची स्थितीही जाणून घेऊ-

राज्यातील पाणी योजनांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. अपूर्ण योजना त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच औरंगाबाद येथील सभेत दिले आहे. त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार अभियानासह सुमारे 800 कोटी रुपये किंमतीच्या पाणी पुरवठा योजनांवरील स्थगिती शासनाने उठवली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील किती आणि कोणत्या योजनांचा समावेश आहे, याची माहिती घेणार असल्याचे देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले.Conclusion:नगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू-

आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील विविध नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने सेनेने तयारी सुरू केली आहे. पक्षसंघटन मजबुतीसह त्या-त्या तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सेनेच्या आमदारांवर जबाबदारी निश्चिती केली जाणार आहे. प्रत्येक आमदाराला स्वतःच्या मतदारसंघासह जवळच्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येणार आहे. यासाठीच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतल्याचे पाटील म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.