ETV Bharat / state

आरक्षण देण्यात कोण कमी पडले, याची संभाजीराजेंना पूर्ण कल्पना- भाजप नेते गिरीश महाजन

संभाजीराजे हे आमच्याच पक्षाचे खासदार आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोण कमी पडले, आरक्षण कशामुळे नाकारले गेले, याची संपूर्ण कल्पना छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते गिरीश महाजन यांनी दिली.

girish mahajan commented over sambhaji raje and maratha reservation in jalgaon
गिरीश महाजन
author img

By

Published : May 29, 2021, 12:33 PM IST

जळगाव - मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोण कमी पडले, आरक्षण कशामुळे नाकारले गेले, याची संपूर्ण कल्पना छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आहे. ते आमच्याच पक्षाचे खासदार आहेत. 7 तारखेला ते काय भूमिका जाहीर करतात? ते पाहूया, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी आज जळगावात दिली.

मोदी सरकारला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तारूढ होऊन दोन वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. जळगावातील पक्ष कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर गिरीश महाजन बोलत होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आरक्षण-

आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की, राज्यात आमचे सरकार असताना मराठा समाजाला परिपूर्ण असे आरक्षण देण्यात आले होते. आरक्षणाच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण बाजू तयार करण्यात आली होती. त्यानंतरच आरक्षण दिले गेले होते. तेव्हा उच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आले होते. मात्र, सरकारने योग्य बाजू मांडल्याने ते आरक्षण टिकले होते. दुर्दैवाने आमचे सरकार गेले. त्यानंतर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार योग्य पद्धतीने बाजू मांडू शकले नाही. म्हणून आरक्षण गेले. आरक्षण नाकारण्यात आले, त्याला भाजप सरकार जबाबदार नाही. महाविकास आघाडी सरकारचे वकील न्यायालयात बाजू मांडायला कमी पडले. म्हणूनच हे आरक्षण नाकारण्यात आले. हे सरकार तीन पक्षांचे असल्याने त्यांच्यात एकमेकांमध्ये मतभेद आहेत. मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री आरक्षणाला विरोध करतात. म्हणूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोपही गिरीश महाजन यांनी यावेळी केला.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया..

संभाजीराजे यांच्या भूमिकेकडे लक्ष-

छत्रपती संभाजीराजे भोसले हे आमच्या पक्षाचे खासदार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात ते आता येत्या सात तारखेला काय करतात, काय भूमिका मांडतात, ते पाहूया, असेही गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तुंचे किट वाटप-

कोरोनामुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन दिव्यांग बांधवांना भाजपच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. आमदार गिरीश महाजन व सुरेश भोळे यांच्या हस्ते हे कीट देण्यात आले. 'भाजपा हा सामाजिक बांधिलकी जोपासणारा पक्ष आहे, कोरोना काळात गोरगरिबांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे', असे मत गिरीश महाजन यांनी यावेळी मांडले.

मुक्ताईनगरातील पक्षांतराबाबत बाळगले मौन-

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या भाजपच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायत भाजपच्या हातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता गिरीश महाजन यांनी विषयाला बगल देत मौन बाळगले. या विषयावर त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.