ETV Bharat / state

जळगावात 'गॅंगवॉर'चा भडका, भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देऊन घडवला गोळीबार - fired in jalgaon

जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या हत्येचे १० महिन्यांनी तीव्र पडसाद उमटले आहेत. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अशोक सपकाळे यांच्या २ मुलांनी आपल्या साथीदारांना जामिनावर असलेल्या संशयित आरोपीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार ४ गुंडांनी संशयिताच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत तो संशयित बचावला.

जळगावमध्ये गोळीबार, एकजण जखमी
जळगावमध्ये गोळीबार, एकजण जखमी
author img

By

Published : Sep 24, 2021, 9:19 AM IST

जळगाव - माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाच्या हत्येचे १० महिन्यांनी तीव्र पडसाद उमटले आहेत. भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी अशोक सपकाळे यांच्या २ मुलांनी आपल्या साथीदारांना जामिनावर असलेल्या संशयित आरोपीच्या हत्येची सुपारी दिली होती. त्यानुसार ४ गुंडांनी संशयिताच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत तो संशयित बचावला. आज (गुरुवारी) सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहर हादरले आहे. आकाश मुरलीधर सपकाळे (वय २४, रा. कांचननगर, जळगाव) असे गोळीबारात बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

जळगावमध्ये गोळीबार, त्याबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक

काय आहे नेमका घटनाक्रम?

कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर गयभू सपकाळे यांचा मुलगा आकाश सपकाळे हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८) याच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आकाशला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोक सपकाळे यांची मुलं बाबू व सोनू सपकाळे यांनी त्यांचे साथीदार विक्की अलोने, मिलिंद सकट, बंटी उर्फ प्रद्युम्न नंदू महाले व राहुल भालेराव यांना सुपारी दिली होती. त्यानुसार आज सकाळी सव्वाआठ वाजेच्या सुमारास हे चौघजण रिक्षाने कांचननगरात आकाशच्या घरी आले. तेव्हा मुरलीधर सपकाळे व त्यांची दोन्ही मुले आकाश व नितीन सपकाळे हे घरात झोपलेले होते. विकी व मिलिंद यांनी आकाशवर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बालंबाल बचावले. हल्लेखोरांनी पिस्तूलातून ४ राऊंड फायर केले. त्यातील एक गोळी झटापटीत आकाशच्या हाताच्या करंगळीला लागल्याने तो जखमी झाला. एक गोळी घरातील भिंतीला लागली.

पळून जाताना विक्की गंभीर जखमी-

गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांसोबत आकाश व नितीन यांची जोरदार झटापट झाली. या झटापटीनंतर पळून जाताना घराबाहेर विकी अलोने याचा पाय गटारीत गेल्याने तो खाली पडला. याचवेळी त्याचे साथीदार मिलिंद, बंटी व राहुल हे पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा मुरलीधर सपकाळे यांच्यासह आकाश, नितीन व रुपेश सपकाळे यांनी विकी अलोने याला लाकडी दांडक्याने, दगडाने जबर मारहाण केली. आकाशने चाकूने वार केल्याने विक्की गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून पिस्तूल, राऊंड जप्त-

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, फायर झालेले ४ राऊंड तसेच संशयित आरोपीचा मोबाईल, रुमाल असे साहित्य जप्त केले. जखमी विक्की व आकाशला पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी पोलिसांनी विकीचा जबाब नोंदवला. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकाश सपकाळे व विक्की अलोने या दोघांनी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले असून, पोलिसांनी दोन्ही गटातील १० जणांना अटक केली आहे.

सुदैवाने नशिराबाद घटनेची पुनरावृत्ती टळली-

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे २ दिवसांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या संशयित आरोपीचा दोघांनी गोळीबार व चॉपरने वार करत निर्घृणपणे खून केला होता. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना घडून काही तास उलटत नाही, तोच जळगावातही अशीच घटना घडली. परंतु, सुदैवाने यात जामिनावर असलेला संशयित आरोपी बचावला आहे. दरम्यान, भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच माजी महापौर पुत्रांनी साथीदारांना सुपारी देऊन गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत असल्याचे, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोळीबाराच्या घटनेचे 'हे' आहे मूळ-

जळगाव शहरातील शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ ४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश अशोक सपकाळे (वय २८) याचा एका टोळक्याने केलेल्या हल्ल्यात खून झाला होता. राकेश सपकाळे हा रात्री साडेअकराच्या सुमारास स्मशानभूमी परिसरातून येत असताना वाटेत दबा धरून बसलेल्या तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर मारेकऱ्यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार केले. त्यामुळे राकेश रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. आधी झालेल्या भांडणातून काटा काढण्यासाठी राकेश सपकाळेचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात तेव्हा निष्पन्न झाले होते. या खून प्रकरणी आकाश मुरलीधर सपकाळे (रा. कांचन नगर), गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा. राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा. कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयितांना नंतर जामीन मिळाला होता. यातीलच एक संशयित आकाश सपकाळे याच्यावर हल्लेखोरांनी आज घरात घुसून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याचे दिसून येत आहे.

शहरातील २ टोळ्यांमधील गॅंगवॉर-

प्रथमदर्शनी शहरातील २ टोळ्यांमध्ये गॅंगवॉर उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राजू उर्फ बाबू सपकाळे हा शिवाजीनगर परिसरातील तरुणांना हाताशी घेऊन शिवाजीनगर ग्रुप नावाच्या गॅंगचा लीडर असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे, शहरातील कांचननगर-जैनाबाद परिसरात आकाश सपकाळे हा लाडू गॅंगचा लीडर असल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात दोन्ही फिर्यादींनी तसा स्पष्ट उल्लेख केल्याने जळगावात गुंडांच्या टोळ्या सक्रिय असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोलिसांसमोर आता हे गॅंगवॉर मोडीत काढण्याचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा - जळगावात भरदिवसा गोळीबार, एकजण झाला जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.