ETV Bharat / state

पिंपळकोठा जवळ उभ्या ट्रकला कार धडकली, 4 जणांचा मृत्यू, 1 जखमी

जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील चार जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

car hit truck near Pimpalkotha
उभ्या ट्रकला कार धडकली पिंपळकोठा
author img

By

Published : Feb 23, 2022, 10:46 PM IST

Updated : Feb 24, 2022, 2:48 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील चार जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा - Shivsena woman leaders : शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांचे रौद्र रूप; चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्याला मारहाणीचा प्रयत्न

एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कारने (क्र.एमएम १९ सीझेड ७३६०) उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान मृतांची नावे अद्याप कळू शकली नाही. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील मृत व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते. क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली. जखमी झालेल्या व्यक्तीला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. यावेळी सुमारे १ तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि पाळधी येथील वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा - मी टरबूजा म्हणणार नाही, पण माझ्या डोक्यावर आणून ठेवला - एकनाथ खडसे

Last Updated : Feb 24, 2022, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.