ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार; महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार - निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक असून, याठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे, तसेच महाविकास आघाडीने या निवडणुकीत केलेल्या दगाबाजीचा निषेध म्हणून भाजपचे उमेदवार माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचा बहिष्कार

author img

By

Published : Nov 8, 2021, 5:04 PM IST

जळगाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या रिंगणातून भाजपच्या सर्वच उमेदवारांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक असून, याठिकाणी शेतकऱ्यांना प्रतिनिधीत्व मिळायला हवे, तसेच महाविकास आघाडीने या निवडणुकीत केलेल्या दगाबाजीचा निषेध म्हणून भाजपचे उमेदवार माघार घेण्यात येत असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीने केलेल्या कोंडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप पक्ष बॅकफुटवर गेला होता. त्यामुळे आता त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातूनच माघार घेतल्याचे बोलले जात आहे.

बोलताना भाजप नेते महाजन

माघारीच्या दिवशी घडल्या नाट्यमय घडामोडी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सोमवारी (दि. 8) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली. भाजपच्या वतीने माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व या बॅंकेवर राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीने सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे जाहीर करत, आमचे सर्व उमेदवार हे अर्ज माघारी घेणार असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीने निवडणुकीत आमच्यासोबत दगाबाजी केली. भाजपच्या प्रमुख नेत्यांचे अर्ज बाद केले. त्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. सुरुवातीच्या काळात ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून लढवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपसोबत चर्चेची खेळी केली. शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला चर्चेत गुंतून ठेवले. जागा वाटपात ठरलेल्या सूत्रानुसार आम्ही फक्त 7 जागा लढण्याची तयारी केली होती. मात्र, शेवटच्या दिवशी त्यांनी सर्वपक्षीय पॅनल होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमची कोंडी झाल्याचे स्पष्ट झाले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्तेचा दुरुपयोग करत भाजपसोबत दगाबाजी केली. याचा निषेध म्हणून आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी केले धक्कादायक आरोप

भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावेळी संचालक मंडळावर धक्कादायक आरोप केले. मागील 5 वर्षांच्या काळात जिल्हा बँकेत अनागोंदी कारभार सुरू होता. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच काही संचालकांनी आपल्याच मर्जीतील संस्थांना बेहिशेबी कोट्यवधी रुपयांचे कर्ज वाटले, असा आरोपही गिरीश महाजन यांनी केला. या गैरव्यवहार संदर्भात आम्ही तपास यंत्रणांकडे तक्रारी केल्या असून, लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हे ही वाचा - ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार; लालपरीची चाके थांबल्याने प्रवासी वेठीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.