ETV Bharat / state

जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध; प्रतिस्पर्धी सेनाही आली सोबतीला

ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 75 पैकी 57 जागा मिळवत स्पष्ट बहुमताने सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सव्वा-सव्वा वर्षे आपल्या इच्छुक नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला होता.

author img

By

Published : Jan 27, 2020, 3:48 PM IST

bharati sonawane elected as mayor of jalgaon
जळगावच्या महापौरपदी भाजपच्या भारती सोनवणे बिनविरोध

जळगाव - महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या भारती कैलास सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत आव्हान देण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराची महापौरपदी वर्णी लागणार, हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोनवणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 75 पैकी 57 जागा मिळवत स्पष्ट बहुमताने सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सव्वा-सव्वा वर्षे आपल्या इच्छुक नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळेंना महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांना काही काळ मुदतवाढ मिळाली होती. मात्र, पक्षातील इतरांनाही संधी मिळावी, म्हणून त्यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र, भाजपच्या भारती सोनवणे यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारती सोनवणे या भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. यामुळे भाजप नेते आणि माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या गटाला पुन्हा संधी मिळाली आहे.

हेही वाचा - पूर्वीच्या सरकारने पोलीस पाटलांच्या मानधनाबाबत केवळ घोषणाच केली - गृहमंत्री

दरम्यान, शिवसेनेकडे 75 पैकी अवघे 15 नगरसेवक आहेत. पुरेसे संख्याबळ नसल्याने शिवसेनेने महापौर पदाच्या निवडणुकीत रस घेतला नाही. भाजपच्या भारती सोनवणेंनी अर्ज दाखल केला तेव्हाच शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला होता. शहर विकासासाठी केवळ विरोधाला विरोध न करता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, हेच लक्षात घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया निवडीच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर आगामी काळात शहरातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही भारती सोनवणे यांनी दिली.

Intro:जळगाव
महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या भारती कैलास सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत आव्हान देण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराची महापौरपदी वर्णी लागणार, हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सोनवणे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.Body:ऑगस्ट 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 75 पैकी 57 जागा मिळवत स्पष्ट बहुमताने सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सव्वा-सव्वा वर्षे आपल्या इच्छुक नगरसेवकांना महापौर पदाची संधी देण्याचा फॉर्म्युला निश्चित केला होता. पहिल्या टप्प्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळेंना महापौर पदाची संधी मिळाली होती. त्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही त्यांना काही काळ मुदतवाढ मिळाली होती. मात्र, पक्षातील इतरांनाही संधी मिळावी, म्हणून त्यांनी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र, भाजपच्या भारती सोनवणे यांच्या व्यतिरिक्त कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारती सोनवणे या भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या पत्नी आहेत. भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या गटाला पुन्हा संधी मिळाली आहे.Conclusion:दरम्यान, शिवसेनेकडे 75 पैकी अवघे 15 नगरसेवक आहेत. पुरेसे संख्याबळ नसल्याने शिवसेनेने महापौर पदाच्या निवडणुकीत रस घेतला नाही. भाजपच्या भारती सोनवणेंनी अर्ज दाखल केला तेव्हाच शिवसेनेने त्यांना पाठींबा दिला होता. शहर विकासासाठी केवळ विरोधाला विरोध न करता सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, हेच लक्षात घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया निवडीच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर आगामी काळात शहरातील मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही भारती सोनवणे यांनी दिली.

बाईट: भारती सोनवणे, नवनिर्वाचित महापौर
सुनील महाजन, विरोधी पक्षनेते, शिवसेना (कपाळाला टिळा)
नितीन लढ्ढा, ज्येष्ठ नगरसेवक, शिवसेना (चष्मा लावलेले)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.