ETV Bharat / state

भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू

ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने भुसावळसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या घटनेत काही राजकीय व्यक्तींची देखील नावे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 7, 2019, 12:20 AM IST

Updated : Oct 7, 2019, 2:49 AM IST

जळगाव - जिल्ह्यातील भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबीयांवर अज्ञातांनी पिस्तुलातून गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून अन्य दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास भुसावळमधील समतानगरमध्ये घडली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह जिल्हा हादरला आहे.

भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू

भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत स्वतः रवींद्र खरात बाबुराव खरात (५०), त्यांचे भाऊ सुनील बाबुराव खरात (५५) मुलगा प्रेमसागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) आणि सुमित गजरे (२५) हे पाच जण मृत झाले आहेत. गोळीबारानंतर जखमी रवींद्र खरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या ठिकाणी डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या घटनेत त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश याच्यासह अन्य एक असे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीला अश्लील बोलणाऱ्या मित्राचे अपहरण करून हत्या

हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार -

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी रवींद्र खरात यांच्या कुटुंबीयांवर पिस्तूलातून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात खरात यांच्यासह चौघे ठार झाले. तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. आरोपींपैकी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

हेही वाचा - रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या

या घटनेची माहिती मिळताच भुसावळचे उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जळगाव येथून पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके हेही घटनास्थळी पोहचले.

हेही वाचा - धक्कादायक! शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकाने घेतले पेटवून

दरम्यान, पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात ही घटना घडल्याने भुसावळसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या घटनेत काही राजकीय व्यक्तींची देखील नावे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी आहे का, या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:जळगाव
जिल्ह्यातील भुसावळ येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबीयांवर अज्ञातांनी पिस्तुलातून गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एकाच तीन जण ठार झाले असून अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज रात्री दहा वाजताच्या सुमारास भुसावळातील समतानगरात घडली. या घटनेमुळे भुसावळ शहर हादरले आहे.Body:पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेत नगरसेवक रवींद्र खरात यांचे भाऊ सुनील खरात, मुलगा सागर खरात यांच्यासह एक जण असे तिघे ठार झाले आहेत. तर रवींद्र खरात, त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश अजून एक जण जखमी झाले आहेत.Conclusion:हल्लेखोरांचा अंदाधुंद गोळीबार-

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी रवींद्र खरात यांच्या कुटुंबीयांवर पिस्तूलातून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात खरात यांचे भाऊ सुनील खरात, मुलगा सागर खरात यांच्यासह एक जण असे तिघे ठार झाले. तर अन्य दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भुसावळचे उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. निवडणुकीच्या काळात अशी घटना घडल्याने भुसावळ शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
Last Updated : Oct 7, 2019, 2:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.